PHOTOS

Shubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!

गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल. 

Advertisement
1/5

खेळपट्टीवर मोठ्या आवेगात खेळणारा शुभमन हा मैदानाबाहेरही बऱ्याच कारणांनी चर्चेत असतो. त्यातलंच एक आणि बहुचर्चित कारण म्हणजे त्याची प्रेमप्रकरणं.... 

2/5

क्रिकेट आणि बॉलिवूड हे काही नवं समीकरण नाही. तसंच पतौडी कुटुंब आणि क्रिकेट हेसुद्धा आता नवं समीकरण नाही. कारण, ज्याप्रमाणं शर्मिला टागोर यांना टायगर पतौडी यांनी डेट केलं आणि पुढे जाऊन त्यांच्यासोबत लग्नही केलं त्याचप्रमाणं आता या कुटुंबातील लाडकी, सारा अली खान म्हणे शुभमनच्या प्रेमात आहे. 

3/5

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सारा अणि शुभमन डेट करत आहेत. मागील वर्षीत दुबईमधील एका रेस्तराँमध्ये ते डिनरला गेले असता, त्या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

4/5

बहुधा सारा हे नाव शुभमनला आवडलेलं असावं. कारण,  (sara Ali khan) सारा अली खानला डेट करण्यापूर्वी त्याचं नाव साला तेंडुलकर म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या मुलीशी जोडलं गेलं होतं. पण, या नात्याविषयी अधिकृत माहिती कधीच समोर आली नाही. 

5/5

इतक्या कमी वयात आपल्या क्रिकेटच्या खेळीनं प्रसिद्ध होण्यासोबतच शुभमन त्याच्या या प्रेमप्रकरणांमुळंही (Shubhman Gill Affairs) चांगलाच नजरा वळवू लागला आहे. इथं महत्त्वाची बाब अशी की हे सगळं ठीक पण, शुभमन किती सातत्यपूर्ण खेळी करतो याकडेच निवड समितीचं लक्ष असेल. 





Read More