PHOTOS

रिंकू सिंहच्या Shirtless फोटोवर शुभमनची बहीण फिदा! तिची कमेंट वाचून चाहते म्हणाले, 'वहिनी सापडल्या!'

Shubman Gill Sister Comment On Rinku Singh Shirtless Photo: शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावत कोलकाता नाईट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिल्यानंतर रिंकू सिंह रातोरात स्टार झाला होता. सध्या रिंकू हा परदेशात सुट्ट्यांसाठी गेला असून तेथून त्याने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंवर भारताचा सलामीवीर शुभमन गिलच्या बहिणीनेही कमेंट केली असून तिची कमेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काय म्हटलंय शुभमनच्या बहिणीने पाहूयात...

Advertisement
1/13

यंदाचं म्हणजेच 2023 चं आयपीएल तरुण खेळाडूंनी गाजवलं. शुभमन गिल, यशस्वी जयसवालबरोबरच फलंदाजीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू ठरला तो कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंह!

2/13

शेवटच्या पाच चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असताना रिंकू सिंहने एकामागोमाग एक 5 षटकार लगावत संघाला अशक्य वाटणार विजय मिळवून दिला होता.

3/13

अवघ्या 50 लाख रुपयांच्या प्राइजला कोलकात्याने संघात सहभागी करुन घेतलेला रिंकू गुजरात जायंट्सविरुद्धच्या या तुफान खेळीमुळे रातोरात स्टार झाला होता. 

4/13

आयपीएलनंतरही रिंकू सिंह चर्चेत आहे तो मैदानातील कामगिरीमुळे नाही तर सोशल मीडियावरील त्याच्या हॉट लूकमुळे.

5/13

विशेष म्हणजे रिंकूचा हा लूक पाहून शुभम गिलची बहीण शहनील गिलही त्याच्यावर फिदा झाली आहे. रिंकूच्या शर्टलेस फोटोवरील शहनीलची कमेंट चांगलीच चर्चेत आहे.

6/13

आयपीएलनंतर रिंकू सिंह सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांसाठी गेला आहे. त्याने त्याच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन स्वत:चे काही शर्टलेस फोटो शेअर केले आहे.

7/13

या फोटोंमध्ये रिंकूचे सिक्स पॅक अॅब्स दिसत आहेत. रिंकूचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन आपली मतं मांडली आहेत.

8/13

रिंकूच्या या शर्टलेस फोटोंवर शुभमन गिलची बहीण शहनीलनेही कमेंट केली आहे. रिंकूचा हा हॉट लूक पाहून शहनीलने त्याचं कौतुक केलं आहे.

9/13

शहनील ही स्वत: एक मॉडेल असून ती इन्स्ताग्रामवर प्रचंड सक्रीय आहे. अनेक खेळाडूंच्या पोस्टवर ती कमेंट्स करत असते. तिला फॉलोअर्सही हजारोंच्या संख्येनं आहेत.

10/13

रिंकूने या फोटोंना "सावधान पुढील कंटेटचं तुम्हाला व्यसन लागू शकतं," अशी मजेदार कॅप्शन दिली आहे.

11/13

रिंकूच्या याच भन्नाट कॅप्शनसहीतच्या फोटोवर शुभमनच्या बहिणीने प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'ओ हीरो' अशी कमेंट शहनीलने या फोटोवर केली आहे. शहनीलच्या या कमेंटलाही हजारोंच्या संख्येनं लाईक्स आले आहेत.

12/13

ही कमेंट पाहून अनेकांना शहनीलच्या रिंकूच्या प्रेमात पडली की काय असा प्रश्न पडला आहे. बऱ्याच जणांनी तिच्या कमेंटवर तशा अर्थाच्या कमेंट्सही केल्या आहेत.

13/13

शहनीच्या या कमेंट खाली काहींनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. "वहिनी सापडली असं वाटतंय रिंकू भय्या" असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "दिदी प्रेमात पडली," असं म्हटलं आहे. 





Read More