टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या झिब्बॉब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू जंगल सफारीला गेले होते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये तीन दिवसांचा ब्रेक असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी जंगल सफारी केली.
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत कुटूंबातील व्यक्ती देखील गेले होते. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
अशातच या जंगल सफारीमध्ये शुभमन गिलची बहिण शाहनील गिल देखील होती. त्याचा व्हिडीओ शाहनीलने शेअर केलाय.
शाहनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत रिंकू सिंग देखील दिसत असल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिंकू सिंगच्या शर्टलेस फोटोवर 'ओ हिरो' म्हणत शाहनीलने कमेंट केली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.