PHOTOS

'बॉयफ्रेंडला भाऊ म्हणायची अन् त्याच्याच सोबत...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या Ex नवऱ्याने केला खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडला म्हणायची भाऊ अन् त्याच्याचसोबत केलं लग्न. अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याने केला धक्कादायक आरोप.  

Advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लहानपणापासूनच अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी मोठ्या पडद्यावर देखील नाव मोठं केलं. 

2/8

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली. आज ती सौंदर्य आणि हॉट लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. 

3/8

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती 44 वर्षांची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. तिने अभिनयाच्या जोरावर पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. 

4/8

तिने टीव्ही मालिकांपासून सुरुवात केली. तर भोजपुरीमध्ये तिने अनेक चित्रपट केले आहेत. श्वेता तिवारी तिच्या सौंदर्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. 

5/8

अशातच राजा चौधरी याने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्याने श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यामधील संबंधांवर वक्तव्य केलं आहे. 

6/8

श्वेता अभिनव कोहली ह्याची ओळख तिचा भाऊ म्हणून करून देयची आणि नंतर त्याच्याच सोबत ती रोमँटिक व्हायची असा खुलासा राजा चौधरीने केला आहे. 

7/8

श्वेता अभिनव कोहलीला भाऊ म्हणायची. नंतर तोच तिचा प्रियकर बनला अन् त्याच्यासोबत लग्न केलं. श्वेता मला आमच्या मुलीलाही भेटू देत नव्हती. याच अटीवर तिने घटस्फोट घेतला असल्याचा खुलासा राजाने केला आहे. 

8/8

श्वेता तिवारीने पहिले लग्न राजा चौधरी यांच्याशी केलं होतं. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने दुसरे लग्न अभिनव कोहलीसोबत केलं. तेही जास्त काळ टिकले नाही. 





Read More