PHOTOS

...म्हणून रात्री बेडवर लोळत Mobile पाहणं धोकायदक! कारणं वाचून तुम्हीही सोडाल ही सवय

Side Effects Of Using Mobile In Bed Before Sleeping: तुम्ही पण त्याच लोकांपैकी आहात का जे झोपण्याआधी बेडवर पडल्या पडल्या स्मार्टफोनवर सर्फिंग करतात? तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. झोपण्यापूर्वी बेडवर लोळत स्मार्टफोनवर सर्फिंग करण्याचे दुष्परिणाम पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. हे दुष्परिणाम कोणते ते पाहूयात...

Advertisement
1/11

फोन ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे असा एका मराठी चित्रपटामधील संवाद सध्याच्या परिस्थितीवर अगदी योग्यपद्धतीने भाष्य करणार आहे. अनेकांना तर सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्मार्टफोन चेक करण्याची सवय असते.

2/11

बरेच जण तर झोपण्यापूर्वीही स्मार्टफोन चेक करुनच झोपतात. बऱ्याचदा स्क्रोल करता करता झोपण्याआधी किती वेळ निघून जातो याचा अंदाजच लोकांना बांधता येत नाही. अनेकदा तर घरच्यांबरोबर एकत्र बसलेले असतानाही काही सदस्य स्मार्टफोनवर स्क्रोल करतानाच दिसतात. मात्र ही सवय फार धोकादायक आहे.

3/11

झोपण्यापूर्वी स्मार्टफोन पाहण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याचा तुम्हाला नक्कीच अंदाज नाही असं तुमच्या सवयीवरुन दिसत आहे. अनेकांना तर स्मार्टफोनचं इतकी सवय लागलेली असते की तो पाहिल्याशिवाय झोपच येत नाही.

4/11

झोपण्याआधी स्मार्टफोन पाहून नये असा सल्ला दिला जातो. ही सवय आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. अनेकदा बेडवर पडून फोनवर सर्फिंग करताना हात एकाच पोजिशनमध्ये असतात.

5/11

अशाप्रकारे एकाच पोजिशनमध्ये शरीराचे महत्त्वाचे अवयव राहिल्यास कालांतराने या अवयवांसंदर्भातील त्रास जाणवू लागतो. खास करुन मान, पाठ आणि डोळे दुखण्याचा त्रास बेडवर पडल्या पडल्या स्मार्टफोन पाहण्याची सवय असणाऱ्यांना होतो. 

6/11

बराच वेळ सतत फोनकडे पाहत राहिल्याने मान दुखण्याचा त्रास होऊ शकतो. पाठीच्या मणक्याला मान जिथे जोडलेली असते त्या ठिकाणी बराच त्रास जाणवू लागतो. याला टेस्ट नेक असं म्हणतात.

7/11

सामान्यपणे अशापद्धतीने मोबाईल पहायचाच असेल तर डोक्याखाली उशी घ्यावी. यामुळे मानेला सपोर्ट मिळतो आणि डोकं, मान आणि पाठ त्यातल्या त्यात एकाच स्तरावर राहण्यास किंवा त्यावर ताण न येण्यास यामुळे मदत होते. 

8/11

मोबाईल पाहताना एखाद्या कुशीवर झोपत असाल तर अशावेळी पोटऱ्यांजवळ एखादी उशी ठेवल्यास मानेवर आणि पाठीवर कमी ताण येतो.

9/11

डोळ्यांचा त्रास - तुम्ही फार वेळ स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सतत स्क्रीनवर नजर असेल तर डोळ्यांना डिजीटल स्क्रीन आणि प्रत्यक्ष वस्तू पाहताना अडचणी येतात. सामान्यपणे या दोन्ही स्थितींमधील रंगांच्या उठावदारपणाशी जुळवून घेणं डोळ्यांना सहज जमत नाही.

10/11

अशापद्धतीने अंधारामध्ये बेडवर पडून स्मार्टफोन पाहणं डोळ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतं. डोळ्यांना थकवा जाणवण्याबरोबर डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ होणे, डोळे लाल पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

11/11

रात्री फोनवर फार वेळ घालवण्याची सवय मोडायची असेल तर स्वत:वर निर्बंध घालून घ्यावेत. यासाठी हल्ली अनेक स्मार्टफोनमध्ये वेलबिंगचा पर्याय उपलब्ध असतो ज्यामध्ये ठरावीक वेळेस फोन बंद पडतो आणि सकाळी पुन्हा सुरु होतो. हा पर्याय वापरुन पाहता येईल. 





Read More