PHOTOS

Sidharth Kiara Wedding: 'ह्या' पॅलेस मध्ये होणार सिद्धार्थ-कियारा च रॉयल लग्न.. एका रुमचं Rent दीड लाख; पाहा INSIDE PHOTOS

Sidharth-Kiara Wedding : कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या प्रमाणेच कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) लग्न करण्यासाठी राजस्थानची निवड केली आहे. हे दोघेही राजस्थामधील जैसलमेरमध्ये असलेल्या 'सूर्यगड पॅलेस'मध्ये (Suryagarh Palace) विवाह बंधनात अडकणार आहेत. 'सूर्यगड पॅलेस'मध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाच्या या 'सूर्यगड पॅलेस' (Suryagarh Palace Photos) काही खास फोटो पाहूयात...

Advertisement
1/6
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos

राजस्थान सध्या बॉलिवूडमधील कलाकारांसाठी सर्वोत्तम वेडिंग डेस्टीनेशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी येथील आलिशान राजवाड्यांमध्ये लग्नं केली आहेत. आता या सेलिब्रेटींच्या यादीमध्ये कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राचाही (Sidharth Malhotra) समावेश होणार आहे.

2/6
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos

'सूर्यगड पॅलेस' (Suryagarh Palace) हा तसा एक जुना किल्ला आहे. त्याचं मेकओव्हर करुन त्याला हॉटेलचा लूक देण्यात आला आहे. या ठिकाणी त्या साऱ्या सुविधा आहेत ज्या कोणत्याही 7 स्टार हॉटेलमध्ये असतात.

3/6

'सूर्यगड पॅलेस' (Suryagarh Palace) मधील खोल्यांचं इंटीरियर आणि थीम फारच वेगली आहे. येथे जर तीन बेडरुम असणारी रुम बूक करायची झाली तर एका रात्रीचं भाडं हे 1 लाख 30 हजार रुपये इतकं आहे.

4/6

समोर आलेल्या माहितीनुसार कियारा आणि सिद्धार्थाने 'सूर्यगड पॅलेस'मधील (Suryagarh Palace) 84 रुम पाहुण्यासाठी बूक केले आहेत. लग्नसोहळा तीन दिवस चालणार आहे. या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी 70 लक्झरी गाड्यांची सोयही करण्यात आली आहे.

5/6

कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राची (Sidharth Malhotra) लव्हस्टोरी 'शेरशाह' चित्रपटाच्या वेळी सुरु झाली. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत हे दोघे एकमेकांना डेट करु लागले. मागील काही काळापासून ते अनेकदा एकमेकांच्या घरांबाहेर पापराझींना दिसून आले होते. 

6/6
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos
Sidharth Kiara Wedding : Jaisalmer Suryagarh Palace Inside Photos

कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राचं (Sidharth Malhotra) लग्न 6 फेब्रवारी रोजी होणार आहे. 'सूर्यगड पॅलेस'मधील कार्यक्रम 5,6,7 तारखेला असतील अशी माहिती समोर आली आहे.





Read More