Signs Of Death: हिंदू धर्मात सर्व 18 पुराणांना फार महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन असलेल्या गरुडामधील संवादाचे वर्षण आहे. या पुराणाला गरुड पुराण असं म्हटलं जात. या पुराणामध्ये मृत्यू आणि त्यानंतरच्या रहस्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे पुराण एखाद्याच्या मृत्यूनंतरच वाचलं जातं. यामध्ये स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, ज्ञान, निती, नियम आणि धर्मासंदर्भातील वर्णन आहे. गरुड पुराणानुसार एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला काही खास संकेत मिळतात. जाणून घेऊयात या संकेतांबद्दल...
मृत्यूपूर्वी आधीच्या जीवनातील अनेक गोष्टी व्यक्तीला आठवतात असं म्हणतात. या माध्यमातून ती व्यक्ती तिच्या आयुष्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टींची उजळणी ती व्यक्ती करते असं म्हणतात. इच्छा असली तरी या व्यक्तीला या गोष्टींबद्दल विचारणं थांबवता येत नाही. अशावेळी या व्यक्तीचं मन अशांत असतं.
गरुड पुराणमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू दिसू लागतो तेव्हा तिला एक रहस्यमय दरवाजा दिसतो. कोणाला आगीच्या ज्वाला दिसतात तर काहींना तेजस्वी प्रकाश दिसतो. मृत्यू जवळ आल्याचे हे संकेत असतात असं म्हटलं जातं.
व्यक्तीच्या हातावरील रेषा म्हणजेच हस्तरेषा या त्याच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा हस्तरेषा धुसर दिसू लागतात. काही लोकांच्या हतावरील रेषा तर हळूहळू नाहीश्या होऊन पूर्णपणे दिसेनाश्या होतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याच्या एक प्रहर आधी त्याला यमदूत दिसतो असं गरुड पुराण सांगतं. नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे असं या व्यक्तीला वाटू लागतं.
मृत्यूपूर्वी व्यक्तीला विचित्र स्वप्नं पडतात. व्यक्तीला स्वप्नात आपले पूर्वज दिसतात आणि त्यांना आपण भेटतोय असं त्याला दिसू लागतं. तसेच स्वप्नात आपले पूर्वज रडताना दिसणे हे सुद्धा मृत्यू जवळ असल्याचे संकेत म्हणून मानलं जातं. (Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)