Singham Again Vs Bhool Bhoolaiyaa 3: 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये कमाईच्या बाबतीत जबरदस्त स्पर्धा बघायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये सर्वात पुढे कोण? वाचा सविस्तर
'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. या चित्रपटांनी प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे.
'सिंघम अगेन' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 43.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'भूल भुलैया 3' चित्रपटाने देखील पहिल्या दिवशी 35.5 कोटींची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.
कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून 5 दिवसांमध्ये आतापर्यंत एकूण 137 कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने 5 दिवसांमध्ये आतापर्यंत 150 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने 'भूल भुलैया 3' ला मागे टाकलं आहे.