सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
Singham Again: सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर आज म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी रिलीज केला आहे. या सिनेमात अजय देवगण, दीपिका पादुकोण,अर्जुन कपूर,टायगर श्रॉफ अशी मोठी स्टारकास्ट दिसणार आहे. पण सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट त्याच्या पहिल्या पोलीस ड्रामा सिंघमचा सिक्वेल आहे. यावेळी अजय देवगणसोबत नवीन कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ दिसणार आहेत. 350 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात करीना कपूर, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर 7 ऑक्टोबर रोजी रिलीज केला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टने त्यासाठी किती पैसे घेतले? जाणून घेऊया.
2011 च्या सिंघम आणि 2014 च्या सिंघम रिटर्न्सला मिळालेल्या यशानंतर, अजय देवगण आता सिंघम फ्रँचायझीच्या तिसऱ्या सिझनमध्ये पोलिसाच्या भूमिकेत परतत आहे. रिपोर्ट्सनुसार, सिंघम अगेन मधील भूमिकेसाठी अजय देवगनने 35 कोटी रुपयांची मोठी रक्कम घेतली आहे. तो रोहित शेट्टी आणि ज्योती देशपांडे यांच्यासोबत सहनिर्मातादेखील आहे.
सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर या आगामी सिक्वेल चित्रपटात ती अवनी कामथ सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. शेट्टीने तिला चित्रपटात सिंघमची ताकद म्हणून दाखवले आहे. रिपोर्ट्सनुसार तिने या चित्रपटातील भूमिकेसाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.
दीपिका पदुकोणने सिंघम फ्रँचायझीमध्ये प्रवेश केला आहे. जी शेट्टीच्या पोलीस विश्वातील पहिली महिला पोलीस अधिकारी असेल. ती लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने या चित्रपटासाठी 6 कोटी रुपये फीस घेतली आहे.
सिंगम युनिव्हर्समध्ये टायगर श्रॉफ एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार असून जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात, रिपोर्ट्सनुसार, त्याने 3 कोटी रुपये शुल्क आकारले आहे आणि त्याचे वडील जॅकी श्रॉफ खलनायक उमर हाफिजच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्याने 2 कोटी रुपये फी घेतली आहे.
अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून वृत्तानुसार त्याने या चित्रपटासाठी 6 कोटी रुपये फी घेतली आहे.
या सगळ्यामध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग सिंघम अगेनमध्ये कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयने त्याच्या भूमिकेसाठी 20 कोटी रुपये आणि रणवीर सिंगने त्याच्या भूमिकेसाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.