PHOTOS

पुढची 5 वर्षे तुम्ही 500, 1000, 1500 आणि 2000 रुपयांची SIP केल्यास किती होईल फायदा?

एसआयपीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Advertisement
1/9
पुढची 5 वर्षे तुम्ही 500, 1000, 1500 आणि 2000 रुपयांची SIP केल्यास किती होईल फायदा?
पुढची 5 वर्षे तुम्ही 500, 1000, 1500 आणि 2000 रुपयांची SIP केल्यास किती होईल फायदा?

SIP investment: नव्या वर्षात तुम्ही आर्थिक समृद्ध होण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. पैसे वाढवण्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड हा एक चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो. दीर्घ मुदतीसाठी एसआयपी चालवलात तर तुम्हाला मिळणारा परतावादेखील चांगला असतो.

2/9
500 रुपयांपासून सुरुवात
 500 रुपयांपासून सुरुवात

एसआयपीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही 500, 1000, 1500 आणि 2000 रुपयांची SIP सतत 5 वर्षे चालवली तर तुम्ही किती पैसे कमवू शकता? याचे गणित समजून घेऊया.

3/9
500 रुपयांची एसआयपी
500 रुपयांची एसआयपी

एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. तुम्ही 5 वर्षे 500 रुपये गुंतवल्यास एकूण 30 हजार रुपये गुंतवणूक रक्कम होईल. 12 टक्के रिटर्नप्रमाणे तुम्हाला 11 हजार 243 रुपयांचा परतावा मिळेल. अशाप्रकारे 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 41 हजार 243 रुपये मिळतील.

4/9
1 हजार रुपयांची एसआयपी
1 हजार रुपयांची एसआयपी

तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी 1 हजार रुपयांची एसआयपी केल्यास तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 60 हजार रुपये इतकी असेल. यावर 12 टक्के रिटर्ननुसार एकूण 22 हजार 486 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 82 हजार 486 रुपये मिळतील.

5/9
1,500 रुपयांची एसआयपी
1,500 रुपयांची एसआयपी

तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 1,500 रुपये गुंतवल्यास आणि ते सतत 5 वर्षे चालवल्यास तुम्ही 5 वर्षांत एकूण 90 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. यावर 12 टक्के दराने तुम्हाला 33 हजार 730 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 1 लाख 23 हजार 730 रुपये रक्कम गोळा झालेली असेल.

6/9
2000 रुपयांची एसआयपी
2000 रुपयांची एसआयपी

5 वर्षे सतत 2000 रुपयांची SIP चालवल्यास तुम्ही 5 वर्षांत एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. यावर तुम्हाला 12 टक्के रिटर्न्सनुसार तुम्हाला 44 हजार 973 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षात तुम्हाला एकूण 1 लाख 64 हजार 973 रुपये मिळतील.

7/9
मार्केट लिंक्ड स्कीम
 मार्केट लिंक्ड स्कीम

एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे त्यामध्ये परताव्याची हमी नसते. सरासरी परतावा 12 टक्के मानला जात असल्याने येथे करण्यात आलेली गणना 12 टक्के आधारावर केली गेली आहे. कधीकधी परतावा यापेक्षा चांगला किंवा कमी असू शकतो. एसआयपीमध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो आणि दीर्घ मुदतीसाठी तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा लाभ मिळतो.

8/9
संपत्ती निर्मिती
 संपत्ती निर्मिती

याशिवाय इतर कोणत्याही योजनेत 12 टक्के परतावा मिळत नाही, त्यामुळे संपत्ती निर्मितीच्या दृष्टिकोनातून ही योजना चांगली मानली जाते. तुम्ही त्यात जितका जास्त वेळ गुंतवाल तितका चांगला नफा मिळवता येईल.

9/9
स्वतःचा रिसर्च करा
स्वतःचा रिसर्च करा

पण तरीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम लक्षात ठेवा आणि स्वतःचा रिसर्च करा. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.





Read More