दरमहा फक्त 5 हजार रुपये गुंतवूनही तुम्ही काही वर्षांत इतके पैसे कमवाल की तुमची तिजोरी भरली जाईल.
SIP Investment Trick:अलीकडच्या काळात एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कल झपाट्याने वाढत चाललाय.एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो, त्यामुळे ही योजना अधिक लोकप्रिय होत चालली आहे. तुम्हालाही SIP सुरू करायची असेल तर फक्त एक ट्रीक माहिती असायला हवी.
दरमहा फक्त 5 हजार रुपयांच्या एसआयपीने सुरुवात करूनही, तुम्ही काही वर्षांत इतके पैसे कमवाल की तुमची तिजोरी भरली जाईल. तुम्हाला तुमच्या निवृत्तीच्या वयात आर्थिक बाबतीत कोणाचीही मदत घेण्याची गरज भासणार नाही. पण हा मोठा फंड कसा बनवायचा? ते जाणून घ्या.
पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमची SIP टॉप अप करावी लागेल. त्याला स्टेप-अप एसआयपी असेही म्हणतात. हे टॉप-अप दरवर्षी करावे लागेल. दरमहा 5 हजारच्या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षी 10% ने टॉप-अप करा. म्हणजेच प्रत्येक वर्षी तुमच्या SIP मध्ये एक छोटी रक्कम वाढवा. या एका ट्रीकने तुम्ही काही वर्षात खूप मोठी रक्कम जमा करु शकाल.
तुम्ही 5 हजार रुपयांची SIP सुरू केली, तर वर्षभर दरमहा 5 हजार रुपये जमा होत राहतील. त्यानंतर पुढच्या वर्षी 5 हजारच्या च्या 10% म्हणजेच 500 रुपयांची एसआयपी वाढवा. दुसऱ्या वर्षात तुमची एसआयपी 5,500 रुपयांची असेल.
त्यानंतर तिसऱ्या वर्षी 5,500 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 550 रुपये वाढवा. तुमची SIP तिसऱ्या वर्षी 6,050 रुपये झालेली असेल. अशा प्रकारे, तुम्हाला सध्याच्या SIP मध्ये दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागेल. या ट्रिकने 20, 25 आणि 30 वर्षात किती कमाई होईल? जाणून घेऊया.
या ट्रीकने तुम्ही सतत 20 वर्षे SIP सुरू ठेवल्यास, तुम्ही 34 लाख 36 हजार 500 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवाल. तुम्हाला यावर 65 लाख 7 हजार 858 रुपये व्याज मिळेल आणि तुमच्याकडे 99 लाख 44 हजार 358 रुपये असतील.
तुमची गुंतवणूक अशीच 25 वर्षे चालू ठेवल्यास एकूण 59 लाख 824 रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर रु. 1 कोटी 54 लाख 76 हजार 907 चे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 2 कोटी 13 लाख 77 हजार 731 मिळतील.
या ट्रीकने 30 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, तुमची गुंतवणूक 98 लाख 69 हजार 641 रुपये इतकी असेल. यावर तुम्हाला 3 कोटी 43 लाख 976 चे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम 4 कोटी 41 लाख 70 हजार 618 रुपये इतकी असेल.