PHOTOS

SIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात.

Advertisement
1/9
SIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!
SIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!

SIP Profit Tips: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात. जुलैमध्ये एसआयपीद्वारे 23 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी झाली.  SIP च्या माध्यमातून गुंतवणुकीत प्रचंड वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे एफडी किंवा इतर गुंतवणूक योजनांपेक्षा एसआयपी गुंतवणुकीकडे जास्त कल आहे. असे असले तरी प्रत्येक एसआयपी करणाऱ्याला बंपर फायदा होतो, असं नाही. यमागे काय कारणं आहेत? बंपर रिटर्न्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घेऊया.

2/9
लहान रकमेपासून सुरुवात
लहान रकमेपासून सुरुवात

SIP तुम्ही किमान 100 रुपये मासिक गुंतवणुकीने सुरू करू शकता. याचा अर्थ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज नाही. आज अशा अनेक योजना आहेत ज्यात 100 रुपयांच्या SIP सह गुंतवणूक सुरू करता येते. त्यामुळे गुंतवणुकीला पैसे नाहीत, ही सबब तुम्हाला देता येत नाही.

3/9
नियमित गुंतवणूक
नियमित गुंतवणूक

म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे, तुम्हाला नियमित बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय लागते. तुम्हाला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. म्हणून तुम्ही त्यासाठी आगाऊ तयारी करता. म्हणजेच नियमित गुंतवणूक ही सवय बनून जाते. 

4/9
ऑटोमॅटीक डिपॉझिट
ऑटोमॅटीक डिपॉझिट

एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करणे सोपे आहे. कारण तुमचे बँक खाते तुमच्या गुंतवणुकीशी लिंक्ड असते. ठरवलेल्या तारखेला तुमच्या खात्यातून पूर्व-निर्धारित रक्कम ऑटोमॅटीक रक्कम वजा केली जाते.

5/9
गुंतवणुकीबाबत शिस्तबद्धता
गुंतवणुकीबाबत शिस्तबद्धता

जर तुम्हाला एसआयपीद्वारे चांगल कमाई करायची असेल तर तुम्हाला गुंतवणुकीत शिस्त लावावी लागेल. याचा अर्थ, जर तुम्ही एकदा गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल तर ती सतत सुरू ठेवा. त्यात खंड पडू देऊ नका. तुम्ही थोड्या रकमेने एसआयपी सुरू करू शकता. असे असले एसआयपी शिस्तीने दीर्घकाळ चालू ठेवल्यास यात चांगला नफा मिळवू शकता.

6/9
खूप मोठ्या रकमेची SIP नको
खूप मोठ्या रकमेची SIP नको

तुम्ही दीर्घकाळ एसआयपी सुरू करत असाल, तर सुरुवातीलाच फार मोठ्या रकमेने करू नका. काहीवेळा अचानक उद्भवलेल्या परिस्थितींमुळे लोक मोठ्या रकमेची SIP सतत चालू ठेवू शकत नाहीत.  एसआयपी मध्येच थांबवावी लागली तर त्यात जास्त फायदा मिळत नाही.

7/9
टॉप अप SIP
टॉप अप SIP

एसआयपीद्वारे मोठा निधी जमा करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही ज्या रकमेने एसआयपी सुरू केली आहे ती रक्कम दरवर्षी थोडी वाढवत राहणे. तुम्ही तुमची SIP दरवर्षी 10 टक्के किंवा अगदी 5 टक्के दराने टॉप अप केल्यास, तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.

8/9
साधी केवायसी प्रक्रिया
साधी केवायसी प्रक्रिया

एसआयपीसाठी कोणती कागदपत्रे लागतात, हे अनेकांना माहिती नसते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा, पॅन आणि आधार देखील आवश्यक असते.

9/9
वॅल्यूएशन
वॅल्यूएशन

एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने फंडाची वार्षिक वाढ आणि कामगिरीचा अंदाज लावू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी एखाद्या फंडात SIP सुरू केली असेल, तर आज त्याचे मूल्य काय आहे? त्याच्या फंडाची वार्षिक वाढ कशी झाली? तसेच संपूर्ण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मॅट्रिक्स देखील समजू शकते.





Read More