तुम्हालाही रात्री झोपताना थोडा तरी उजेट लागतो का. पण रात्री लाइट लावून झोपण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
जर तुम्हालाही रात्री लाइट लावून झोपायची सवय असेल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळं या 5 आरोग्याच्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते.
जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत लाइट जावून झोपत असाल तर तुम्हाला डिप्रेशनचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रकाशामुळं तुमच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मेंटल हेल्थवर परिणाम होतो.
असं म्हटलं जातं की लाइट लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. अशावेळी सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो. त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो.
जर तुम्ही रात्री लाइट लावून झोपत असाल तर त्यामुळं लठ्ठपणादेखील वाढू शकतो. कारण लाइट लावून झोपल्यामुळं सतत झोपमोड होते आणि आपल्याला भूक लागते.
जर तुम्ही विसरभोळे झाले असाल तर त्याचे कारण लाइट लावून झोपणे असू शकते. लाइट लावून झोपल्याने तुमची झोप अर्धवट होते त्यामुळं चिडचिड होणे आणि एकटेपणा जाणवू लागतो. त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवरही होऊ शकतो.
लाइट लावून झोपल्याने हाय ब्लड प्रेशर, हृदयाच्या संबंधीत आजारांमध्येही वाढ होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)