Village Alog Longest Street In Country: या गावाचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गावचे एरिअल फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जाणून घ्या कुठे आहे हे गावं आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये...
या गावाचे एरिअल फोटो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या कुठे आहे हे गाव आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये...
गाव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये ठिकाठिकाणी विखुरलेली घरं, एका ठिकाणी गावातील चौक जिथे एसटी ये जा करते, चावडी असं सारं चित्र डोळ्यासमोर येतं.
मात्र गावाच्या रचनेची ही पारंपारिक संकल्पना मोडून काढणारं एक अगदीच आगळंवेगळं गाव जगभरात त्याच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सगळी घरं एकाच रस्त्यावर आहेत.
मुळात या गावात 6 हजार लोक राहतात. या गावातील घराची संख्या 1600 इतकी आहे. मात्र ही सगळी घरं एकाच रस्त्यावर असून उर्वरित भाग हा लांब लांब पट्ट्यांसारखी दिसणारी शेत जमीन आहे. या गावाचा एरिअल लूक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
बरं आता हे गाव नेमकं आहे कुठे? त्याचं नाव काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या गावाचं नाव आहे सुलोझोवा! हे गाव पोलंड देशातील मालोपोल्स्का प्रांतामध्ये आहे. या भागाला मिनी पोलंड असंही म्हटलं जातं. पोलंडमध्ये या गावाचं टोपण नाव पोलिश हिरा असंही आहे.
सुलोझोवा गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या रस्त्याच्या दुतर्फ वसलेलं आहे तो पोलंडमधील सर्वाधिक लांबीचा रस्ता आहे. क्राकोव्स्का असं या रस्त्याचं नाव असून सुलोझोवा गाव या रस्त्यावरील 9 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे. हे गाव पोलंडमधील प्रसिद्ध अशा ओजकोव्स्की राष्ट्रीय उद्यानाच्या भागात येतं.
या गावातील हॉस्पीटल, शाळा, बँका सारं काही एकाच रस्त्यावर आहे. या गावाचा इतिहासही फार रंजक आहे. आधी हे गाव लहान होतं तेव्हा ते केवळ अर्धा किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेलं होतं.
मात्र जसजशी लोकसंख्या वाढू लागली तशी नंतर तशी सुलोझोवा गावातील घरांची संख्या वाढल्याने ही घरं या रस्त्याच्या आजूबाजूलाच मूळ गावाच्या दोन्ही दिशेंना पण रस्त्याला लागूनच पसरली आणि आजचं गाव तयार झालं.
असं म्हणतात की 16 व्या शतकामध्ये पोलंडच्या राज्याच्या एका लष्करी अधिकाऱ्याने हे गाव स्थापन केलं. या गावापासूनच जवळच असलेला एक किल्ला पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहे. या गावाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.
खरं तर गावाच्या रचनेचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे हे गाव शेतांमध्येच वसलं असून शेतामधून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फाच घरं वसली आहेत. त्यामुळेच घरांच्या मागेच लांबच लांब शेतांचे पट्टे दिसून येतात. हे शेतांचे पट्टे 1 ते 2 किलोमीटर लांबीचे असतात.
या गावातील गावकऱ्यांनी आपली संस्कृती उत्तमप्रकारे जपली आहे. येथे वर्षातून एकदा स्ट्रॉबेरी डे आणि एकदा पोटॅटो डे साजरा केला जातो. त्यावेळी गावात संस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मेजवाणीचाही बेत असतो. या दिवशी सर्व गावकरी एकत्र येतात.