PHOTOS

दुकानदार तुम्हाला विकतोय चोरीचा स्मार्टफोन? 'या' नंबरने काढा सर्व कुंडली!

स्मार्टफोन खरेदी करताना दुकानदाराकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यताही असते. अनेकदा दुकानदार आपल्या ग्राहकांना चोरीचा स्मार्टफोन विकतात. पण तुम्ही हे ओळखणार कसं?

Advertisement
1/11
दुकानदार तुम्हाला विकतोय चोरीचा स्मार्टफोन? 'या' नंबरने काढा सर्व कुंडली!
दुकानदार तुम्हाला विकतोय चोरीचा स्मार्टफोन? 'या' नंबरने काढा सर्व कुंडली!

Smartphone tips and tricks: आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. शहरांमध्ये तर स्मार्टफोन नसेल असे तरुण फार क्वचितच दिसतील. त्यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होते.

2/11
तुमची फसवणूक होण्याची शक्यता
तुमची फसवणूक होण्याची शक्यता

स्मार्टफोन खरेदी करताना दुकानदाराकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यताही असते. अनेकदा दुकानदार आपल्या ग्राहकांना चोरीचा स्मार्टफोन विकतात. पण तुम्ही हे ओळखणार कसं?

3/11
अनेकांना ही ट्रिक माहीत नाही
अनेकांना ही ट्रिक माहीत नाही

चोरीचा स्मार्टफोनविकणे आणि खरेदी करणे दोन्ही कायदेशीरदृष्ट्या धोकादायक आहे. पण एका साध्या युक्तीने तुम्ही फोन चोरीचा आहे की नाही हे तपासू शकता. भारतातील अनेकांना ही ट्रिक माहीत नाही. चला, जाणून घेऊया ही सोपी पद्धत!

4/11
फोन चोरीचा आहे की नाही?
फोन चोरीचा आहे की नाही?

दूरसंचार विभागाने (DoT) 'Know Your Mobile (KYM)' नावाची सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे तुम्ही फोन चोरीचा आहे की नाही हे सहज जाणून घेऊ शकता. फोनचा युनिक IMEI नंबरसर्वप्रथम तुमच्या फोनवर *#06# डायल करा. यामुळे तुमच्या फोनचा 15 अंकी युनिक IMEI नंबर स्क्रीनवर दिसेल.

5/11
SMS पाठवा आणि माहिती मिळवा
SMS पाठवा आणि माहिती मिळवा

तुमच्या फोनवर KYM <स्पेस> 15 अंकी IMEI नंबर टाइप करा आणि हा मेसेज 14422 या नंबरवर पाठवा. SMS पाठवल्यानंतर तुम्हाला एक उत्तरादाखल मेसेज मिळेल. यामध्ये फोनचा ब्रँड, मॉडेल, निर्माता यासारखी माहिती असेल. जर ही माहिती मिळाली, तर फोन खरेदी करण्यास सुरक्षित आहे.

6/11
'Blacklisted' मेसेज आला तर?
'Blacklisted' मेसेज आला तर?

जर उत्तरादाखल मेसेजमध्ये 'Blacklisted' असा उल्लेख असेल, तर समजून जा की तो फोन चोरीचा आहे. अशा फोनची तक्रार सरकारच्या CEIR पोर्टलवर आधीच नोंदवलेली असते. असा फोन कधीही खरेदी करू नका!

7/11
CEIR पोर्टल
CEIR पोर्टल

जर तुमचा फोन चोरीला गेला असेल, तर तुम्ही Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. यामुळे चोरीचा फोन ब्लॅकलिस्ट होतो आणि त्याचा वापर कठीण होतो.

8/11
खरेदीपूर्वी तपासणी
खरेदीपूर्वी तपासणी

सेकंड-हँड फोन खरेदी करताना नेहमी IMEI तपासा. दुकानदाराने बॉक्सवरील IMEI आणि फोनमधील IMEI जुळतात की नाही हेही पाहा.

9/11
ऑनलाइन खरेदी
ऑनलाइन खरेदी

ऑनलाइन फोन खरेदी करताना, विक्रेत्याकडून IMEI नंबर मागा आणि KYM सेवेद्वारे तपासा.

10/11
कायदेशीर सल्ला
कायदेशीर सल्ला

चोरीचा फोन आढळल्यास, त्वरित पोलिसांना कळवा. यामुळे तुम्ही कायदेशीर अडचणी टाळू शकता.

11/11
IMEI ची काळजी
IMEI ची काळजी

IMEI नंबर हा गोपनीय असतो. तो अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका, अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो.





Read More