PHOTOS

'जिया धडक-धडक' फेम अभिनेत्री डिप्रेशननंतर आता अशी दिसते

Advertisement
1/6

२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'कलयुग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्माइली सुरी ने सर्वांचीच मनं जिंकली. गाणं 'जिया धडक-धडक' हे गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. मात्र, स्माइलीचं सिनेसृष्टीतील करिअर काही खास झालं नाही.

2/6

अभिनेत्री स्माइली बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी यांची बहिण आहे. तसेच मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांची भाची आहे. स्माइलीने नुकताच आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

3/6

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी स्माइलीने पोल डान्स केला आहे. मी लहानपणापासूनच डान्समध्ये अॅक्टिव्ह असल्याचं स्माइलीने म्हटलं आहे. 

4/6

काही दिवसांपूर्वी कुणीतरी स्माइलीला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये असल्याचं तिला कळलं. 

5/6

स्माइलीने २०१४ मध्ये विनीत बंगेरासोबत विवाह केला. रिपोर्ट्सनुसार, स्माइलीचं कौटुंबिक आयुष्य सुखमय नाहीये. तसेच आपल्या कौटुंबिक आयुष्यावर बोलण्यास स्माइलीने नकार दिला आहे.

6/6

स्माइली टीव्ही प्रोग्राम नच बलियेच्या सीजन ७ मध्ये आपला पती विनीतसोबत दिसली होती. आता स्माइली पोल डान्सर आहे आणि अनेकांना डान्स शिकवते. (सर्व फोटो सौजन्य: स्माइली सुरीचं फेसबुक अकाऊंट)





Read More