चारचौघात गेल्यावर कॅमल टो मुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटत, खुलून वावरता येतं नाही कारण, कॅमल टो दिसणं हे काही फॅशन नाहीये उलट फॅशन डिझास्टर म्हणून याकडे पाहिलं जातं.
खूप फिटिंग आणि पातळ कपड्याच्या पॅन्ट असतील तर बऱ्याचदा या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं
तुम्ही पॅंटी लायनर वापरू शकता. ते सहज पॅंटीच्या आतल्या बाजूने लावलं, की कॅमल टो दिसणार नाही.
कॅमल टो गार्ड वापरू शकता. कॅमल टो गार्ड ऑनलाईन सहज उपलब्ध असतात.
जाड कापड असणारी पॅंटी वापरा. त्यामुळे योनी मार्गाचा शेप पातळ किंवा फिटिंग पॅन्ट मधून दिसणार नाही आणि तुम्हाला चारचौघात अवघडलेपणा येणार नाही.
जर तुमच्याकडे वरीलपैकी काहीच नसेल तर लांबीला मोठा असेल असा टॉप किंवा कुर्ता या पॅन्टवर घालून कॅमल टो झाकू शकता.