बॉलिवूडमधील हा अभिनेता आहे सर्वांचा आवडता. ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, या अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे प्रसिद्ध होण्यासाठी संघर्ष करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. जो आज बॉलिवूडचा टॉप अभिनेता आहे.
आम्ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्याबद्दल बोलत आहोत. ज्याच्या 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
पण तुम्हाला माहिती आहे का की रणबीर कपूरला कधी काळी सेटवर साफ-सफाई करावी लागत होती. तर कधी त्याला मारहाण देखील झाली होती. स्वत: अभिनेत्याने याबाबत खुलासा केला आहे.
रणबीर कपूरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आज तो इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
रणबीरने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला की, त्याने अमिताभ बच्चन यांच्या 'Black' चित्रपटाच्या सेटवर दिवे लावण्याचे काम केले होते.
या चित्रपटाच्या सेटवर त्याला इतरांप्रमाणेच वागवले जात असे. सेटवर त्याला अनेक वेळा मारहाणही झाली. त्याचबरोबर त्याला अनेकवेळा शिवीगाळही केली.
मात्र, तो या अनुभवातून खूप काही शिकला. यामागे त्याचा एकच हेतू होता की, संजय लीला भन्साळी यांनी त्याला एका चित्रपटात मुख्य नायक म्हणून कास्ट करावे.