Sonam Kapoor Son Birthday : लेकाचा पहिला वाढदिवस साजरा करत सोनम कपूरनं इतरही पालकांना सुचवला सुरेख आणि परवडणारा पर्याय
Sonam Kapoor Son Birthday : सोनम आणि आनंदनं नुकताच त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला. सहसा परदेशात असणाऱ्या सोनमनं यानिमित्तानं भारतात दिल्लीतील घरी एका छोटेखानी समारंभाचं आयोजन केलं होतं.
लेकाचा पहिला वाढदिवस, त्यातही सोनमचं सेलिब्रिटी कुटुंब. त्यामुळं अनेकांनीच मोठ्या सेलिब्रेशनची अपेक्षा ठेवली होती.
प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. कारण, सोनमनं कोणताही मोठा सोहळा न करता घरातल्या घरातच हा क्षण साजरा केला
इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं आपण एक पूजा ठेवल्याचं सांगितलं. वायूच्या रुपाकत मिळालेल्या या आशीर्वादासाठी तिनं यावेळी विश्वाचे आभार मानले. सोनमचा हा निर्णय अनेक पालकांना पटण्याजोगा आहे असं म्हणायला हरकत नाही.
एखादी लहानशी पूजा, कुटुंबीयांसोबत भेटीगाठी आणि तितकाच लहानसा समारंभ असल्यास लहान मुलांचीही चिडचीड होत नाही आणि सोबतच इतरांनाही समारंभाचा आंद लुटता येतो.
सोनमनं वायूच्या वाढदिवसानिमित्त घराला साजेशी सजावटही केली होती. पण, कुठे भडकपणा नव्हता. पाश्चिमात्य गोष्टींना काहीसं दूर सारत तिनं यावेळी भारतीय पेहरावाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.
डायनिंग टेबल म्हणू नका किंवा मग घराचं प्रवेशद्वार, वायूच्या वाढदिवसाची चाहूल प्रत्येक ठिकाणी लागत होती. त्याच्या वाढदिवसानिमित्त आनंद आणि सोनमच्या पालकांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
सोनमनं लेकाचा वाढदिवस साजरा करत नकळत अनेक पालकांनाही काही सुरेख कल्पना दिल्या. तुम्हाला आवडलं का हे सेलिब्रेशन? (Sonam Kapoor)