PHOTOS

Sonu Sood Birthday: फक्त 5 हजार रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; गरिबांनी तर मंदिरं बांधलीयेत

Sonu Sood Birthday: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद 30 जुलैला आपला 51 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आज करोडोंचा मालक असणारा सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त 5 हजार रुपये होते. 

 

Advertisement
1/10

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय आपलं करिअर उभं केलं आहे. आज तो बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असला तरी यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागला आहे. सोनू सूद जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त 5 हजार रुपये होते. पण आज तो करोडोंचा मालक आहे. त्याचं मुंबईत आलिशान घर, गाड्या आहेत. 

 

2/10

सोनू सूदने ‘शहीद-ए-आजम’ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2002 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 

 

3/10

सोनू सूदने फक्त हिंदीच नाही तर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

 

4/10

आज सोनू सूदची मुंबईत करोडोंची संपत्ती आहे. पण एक वेळ होती जेव्हा त्याच्या खिशात फक्त 5 हजार रुपये होते. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर आज तो करोडपती आहे. 

 

5/10

सोनू सूदचं मुंबईतील अंधेरीमधील लोखंडवाला परिसरात आलिशान घर आहे. 

 

6/10

सोनू सूदला लक्झरी गाड्यांचीही खूप आवड आहे. पोर्शे पनामेरा आणि मर्सिडीज बेंझ एमएल-क्लास सारख्या आलिशान गाड्या त्याच्या गॅरेजमध्ये आहेत.

 

7/10

सोनू सूदकडे आज 135 ते 140 कोटींची संपत्ती आहे. तो फक्त जाहिरातीच नाही तर रिअॅलिटी शोमधूनही पैसे कमावतो. 

 

8/10

सोनू सूद चित्रपटासाठी 2 ते 3 कोटींचं मानधन घेतो. 

 

9/10

कोविड काळात गरिबांना मदत केल्याने अनेक लोक सोनू सूदला देव मानतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि चेन्नईत तर लोकांनी त्यांची मंदिरं बांधली आहेत. 

 

10/10

चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास सोनू सूद लवकरच फतेह चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात त्याच्यासह जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.





Read More