Entertainment : महाभारतात चित्रांगदाची भूमिका, रेखासोबत काम तरीही तिला बी ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं.
या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी 1985 मध्ये मिस इंडिया किताब पटकावला होता.
त्यानंतर पहिलाच चित्रपट रेखासोबत करत बॉलिवूडमध्ये तगडी एन्ट्री मारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावावर केला.
आम्ही बोलत आहोत, खून भरी मांगमधील अभिनेत्री सोनू वालिया हिच्याबद्दल. तिचं खरं नाव संजीत कौर वालिया असं आहे
या चित्रपटानंतर तिने 1988 मधील आकर्षण चित्रपटात अतिशय बोल्ड सीन्स दिले. मात्र हवी तशी प्रसिद्धी तिला मिळाली नाही.
यानंतर सोनूने बी ग्रेड चित्रपटात काम करायला सुरु केली आणि तिला टीकेचा सामना करावा लागला.
अचानक तिने एनआरआय उद्योगपती सूर्य प्रकाशसोबत लग्न केलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
लग्नाच्या 13 वर्षांनंतर पतीच्या निधनाने तिला मोठा धक्का बसला ज्यात तिची स्मरणशक्ती गेली होती.
आई वडिलांसोबत दोन वर्ष राहिल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा आली आणि तिने एनआरआय चित्रपट निर्माता प्रताप सिंग यांच्याशी दुसरं लग्न केलं.