PHOTOS

सौरव गांगुलीच्या शिरपेचात मानाची तुरा! मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अचानक केली मोठी घोषणा

CM Mamata Banerjee : जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेला मंगळवारी सुरुवात झाली. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी कोणती घोषणा केली पाहा...

Advertisement
1/6
ब्रँड अॅम्बेसेडर
ब्रँड अॅम्बेसेडर

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. 

2/6
ममता बॅनर्जी म्हणतात...
ममता बॅनर्जी म्हणतात...

सौरव गांगुली खूप लोकप्रिय व्यक्ती आहे आणि तो तरुण पिढीसाठी खूप चांगले काम करू शकतो. मला त्यांचा बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून समावेश करायचा आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

3/6
दीदी फोन करतात अन्...
दीदी फोन करतात अन्...

दीदी मला प्रत्येक चांगल्या प्रसंगी फोन करतात. त्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कधीकधी मला समजत नाही की त्या मला का कॉल करतात? पण या सन्मानाने मी भारावून गेलोय, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

4/6
बीसीसीआयचे अध्यक्ष
बीसीसीआयचे अध्यक्ष

गांगुलीला पश्चिम बंगाल राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलंय. तो यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचा अध्यक्ष होता. 

5/6
तुम्ही इथं कसे ?
तुम्ही इथं कसे ?

अनेक लोक म्हणतात की बंगाल ही केवळ हिंसाचाराची भूमी आहे. मग तुम्ही सर्वजण इथं कसे आला आहात? असा खोचक सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला.

6/6
अफवा
अफवा

दरम्यान, काही राजकीय पक्ष अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला आहे.





Read More