दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं.
निर्माता- दिग्दर्शक विघ्नेश शिवन याच्यासोबत नयनतारानं काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. नुकत्याच समोर आलेल्या या अभिनेत्रीनं चेन्नईमध्ये असणाऱ्या घराचा कायापालटच केला आहे.
नयनतारानं हे घर पतीला लग्नात भेट स्वरुपात दिलं. साधारण 20 कोटी रुपयांना तिनं हे घर खरेदी केलं. कोणा एका महालाहून नयनतारा आणि विघ्नेशच्या या नव्या घराचा थाट कमी नाही. जाणून आश्चर्य वाटेल, पण या घराचं बाथरूमच दोन मोठ्या खोल्यांसमान आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 16 हजार चौरस फुटांच्या भूखंडावर नयनताराचा हा आलिशान प्रासाद उभा आहे. तिच्या घरात स्विमिंग पूल, थिएटर आणि जीमची व्यवस्थाही आहे.
बऱ्याच माध्यमांमध्ये असणाऱ्या माहितीनुसार या घराची नोंदणी नयनताराचा पती, विघ्नेश शिवन याच्या नावे करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच नयनतारा आणि विघ्नेश यांनी त्यांच्या या नात्यात सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं स्वागत केलं. आता या सुरेखशा घरात हे कुटुंब अगदी सुखात आणि आनंदात राहत आहे. (सर्व छायाचित्रे- Instagram)