Sovereign Gold Bond Scheme: ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांसाठी, गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी केली जाईल.
Sovereign Gold Bond Scheme: सरकार या महिन्यात सॉवरेन गोल्ड बॉन्डचा एक हप्ता जारी करेल आणि दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाईल.सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2023-24 सिरिज-3 या महिन्यात 18-22 डिसेंबर रोजी खुली होईल. 28 डिसेंबर 2023 रोजी सॉवरेन गोल्ड बॉन्ड जाहीर होणार आहे. सीरिज-4 साठी 21 फेब्रुवारीऐवजी 12-16 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही सिरिज-1 19 ते 23 जून दरम्यान खुली होती आणि सिरिज-2 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान खुली होती.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड शेड्युल्ड कमर्शियल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसेसद्वारे जारी केले जातात. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) सारख्या आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजद्वारे विकले जातात.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना 2023-24 भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करेल. SGBs फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट, विद्यापीठे, धर्मादाय संस्था यांना विकले जातील. या योजनेअंतर्गत 1 ग्रॅम सोन्यात किमान गुंतवणूक केली जाऊ शकते तर कमाल मर्यादा 4 किलोपर्यंत आहे.
सुवर्ण रोख्यांची विक्री नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथम पारंपारिक सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि घरगुती बचतीचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली. सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा परिपक्वता कालावधी 8 वर्षांचा असेल परंतु 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडण्याचा पर्याय असेल.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांसाठी, गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी केली जाईल. SGB साठी पेमेंट रोख पेमेंट (जास्तीत जास्त रु 20,000) किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेक किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगद्वारे केले जाईल. SGBs GS कायदा, 2006 अंतर्गत भारत सरकार स्टॉक म्हणून जारी केले जातील. यासाठी गुंतवणूकदारांना होल्डिंग सर्टिफिकेट दिले जाईल. हे रोखे डीमॅट स्वरूपात हस्तांतरित केले जातील.
गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या नाममात्र मूल्यावर वार्षिक 2.50% च्या निश्चित दराने सहामाही पैसे दिले जातील. SGBs कर्जासाठी संपार्श्विक म्हणून वापरले जाऊ शकतात. लोन टू व्हॅल्यू (LTV) गुणोत्तर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने वेळोवेळी दिलेल्या नियमानुसार सामान्य सोने कर्जाच्या बरोबरीने ठेवले जाईल.
सॉवरेन बॉन्ड खरेदीसाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड/पॅन किंवा TAN/पासपोर्ट आवश्यक असेव. प्रत्येक अर्जासोबत आयकर विभाग आणि इतर युनिट्सने जारी केलेला पॅन क्रमांक असावा.
आयकर कायदा, 1961 (1961 चा 43) च्या तरतुदींनुसार, SGB वरील व्याज करपात्र असेल. गुंतवणूकदाराला सॉवरेन बॉण्ड गुंतवणुकीतून मिळालेल्या नफ्यात कर सवलत दिली जाते. एखाद्या व्यक्तीला बाँड्सच्या हस्तांतरणावर मिळालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी इंडेक्सेशन फायदे दिले जातात.