Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.
यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटनांमध्ये काही ग्रह पृथ्वीजळून जाणार आहेत. तर काही दिवशी उल्कावर्षाव आणि धूमकेतूही पाहता येणार आहेत.
3 नोव्हेंबरला गुरु पृथ्वीजवळ येत असून, संपूर्ण महिनाभर तो पूर्व दिशेला साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. तर, 9 नोव्हेंबरला पहाटे शुक्र आणि चंद्राची युती पाहायला मिळेल.
10 नोव्हेंबरला पृथ्वीजवळ सी/ 2023 एच 2 हा धूमकेतू येणार असून, तो दुर्बिणीतून पाहता येणार आहे. तर, 13 नोव्हेंबरला युरेनस ग्रह पृथ्वीजवळ येणार आहे. साध्या डोळ्यांनी तो पाहता येईल.
14 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्र आणि बुधासह मंगळ ग्रहाची युती दिसेल. त्यामुळं हे ग्रह तुम्ही पाहू शकणार आहात.
17 आणि 18 नोव्हेंबरला पूर्वेला रात्री लिओनीड उल्कावर्षाव पाहायला मिळेल. इथं ताशी 20 उल्का दिसण्याची शक्यता आहे.
20 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्रासोबत शनिची युती पाहायला मिळेल. तर, 25 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्र आणि गुरु ग्रहाची युती दिसू शकते.
27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असल्यामुळं चंद्र आणखी तेजस्वी दिसेल. 28 नोव्हेंबरला पहाटे शुक्र ग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं तो आणखी तेजस्वी दिसणार आहे.