PHOTOS

काव्या मारनसाठी वाईट बातमी, SRH चे मालकी हक्क सोडावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Advertisement
1/8

काव्या मारन हे नाव अगदी सगळ्यांचं माहित आहे. आयपीएएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची ती मालकीण आहे. याशिवाय ती तिच्या लुक्समुळे फारच चर्चेत असते. पण आता तिच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. तिची आयपीएल टीम एसआरएच अडचणीत येऊ शकते...

 

2/8

काव्या मारन ही एका प्रसिद्ध बिझनेसमॅनची मुलगी आहे.  काव्या मारनचे वडील कलानिधी मारन आणि सन टीव्ही हे आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक आहेत.

 

3/8

2003 मध्ये वादग्रस्त शेअर वाटपाद्वारे कंपनीचे नियंत्रण फसवणूक करून स्वतःकडे घेतल्याबद्दल काव्या मारन यांचे वडील कलानिधी मारन यांना माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

4/8

दयानिधी मारन हे सन टीव्हीची जुनी शेअरहोल्डिंग स्ट्रक्चर सप्टेंबर 2003 पूर्वीची स्थितीत रिस्टोअर करण्याची मागणी करत आहेत.  मारन कुटुंब आणि दिवंगत एम करुणानिधी यांचे कंपनीत समान शेअर्स होते.

5/8

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे करुणानिधी यांचे पुत्र आहेत. न्यायालयात जाणाऱ्या वादात कलानिधी मारन आणि त्यांचे भाऊ एम करुणानिधी कुटुंब यांच्यात लढत होताना दिसत आहे. यामुळे कदाचि सन टीव्हीवरील नियंत्रण धोक्यात येईल.

6/8

अशाच प्रकारे एसआरएच संघही धोक्यात आहे. जर हा वाद लवकर सोडवला गेला नाही, तर तो सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःस्वप्न बनू शकतो. 

7/8

दयानिधी मारन यांचा आरोप आहे की त्यांचे भाऊ कलानिधी मारन यांनी 15 सप्टेंबर 2003 रोजी योग्य मूल्यांकन, शेअरहोल्डरची मान्यता किंवा बोर्डाच्या ठरावांशिवाय स्वतःला 1.2 दशलक्ष इक्विटी शेअर्स घेतले. 

 

8/8

काव्या मारन एसआरएच आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. पण टीम पुढील महिन्यात इंग्लंड लीग 'द हंड्रेड' मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होत आहे.

 





Read More