Maharashtra SSC Result 2023 Today : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल (10th Result) उद्या म्हणजे 2 जूनला लागणार आहे. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन (Online Result) पाहता येईल.. त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय.. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत (SSC Students) त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत यंदा 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये 84 हजार 416 विद्यार्थी आणि 73 हजार 62 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. याशिवाय www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरीह विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार आहेत.
निकाल पाहाण्यासाठी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा. तिथे गेल्यावर दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख, तुमच्या आईचं नाव आणि आवश्यक माहिती भरा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.