PHOTOS

Layoff मध्ये नोकरी गेली तरी डिप्रेशनची वेळ नाही येणार; आतापासूनच सुरु करा 'हे' काम

नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.

Advertisement
1/7
Layoff मध्ये नोकरी गेली तर 'या' Ideas येतील कामी; आतापासूनच करा प्लानिंग!
Layoff मध्ये नोकरी गेली तर 'या' Ideas येतील कामी; आतापासूनच करा प्लानिंग!

Work Ideas: गुगलने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचाही अशाच संदर्भातील एक ईमेल व्हायरल होतोय. रोज तुमच्या कानावर लेऑफच्या बातम्या येत असतात. एखादे स्टार्टअप बंद पडल्यास किंवा त्याचे कामकाज कमी केल्यास आणि अचानक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतात. पण मग अशावेळी त्या कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.

2/7
सपोर्ट घ्या
सपोर्ट घ्या

जेव्हा एखादा स्टार्टअप अयशस्वी होतो तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावावी लागते. मग ते निराश, दुःखी होतात. घाबरू लागतात आणि त्यांना स्वत:चे भविष्य अंधकारमय वाटू लागते. या भावनांशी लढण्यासाठी आपल्या समवयस्क आणि जवळच्या व्यक्तींशी बोलणे आवश्यक आहे. जे मित्र तुमच्याशी सकारात्मक बोलतात त्यांच्याशी बोला. तसेच अशा लोकांची मदत घ्या जे तुम्हाला या आव्हानात्मक काळात तुटण्यापासून वाचवतील आणि तुमच्यासाठी काही नोकरी किंवा कामाची व्यवस्था करण्यात मदत करतील.

3/7
पुढचा विचार करण्याची मानसिकता
पुढचा विचार करण्याची मानसिकता

स्टार्टअप बंद झाल्यास नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुढे जाण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. तुम्ही स्वतःला समजावून सांगा की,  आव्हाने आणि अपयश ही तुमच्या वाढीसाठी आणि विकासाची उत्तम संधी आहे. यासोबतच तुमच्या आवडीनुसार बाजारात कोणत्या नवीन संधी येत आहेत ते पहा. सतत नोकरीसाठी अर्ज करत राहा. तुमचा सीव्ही वारंवार नाकारला गेला तरीही निराश होऊ नका.

4/7
तुमच्या मोकळ्या वेळेत नवीन कौशल्य शिका
तुमच्या मोकळ्या वेळेत नवीन कौशल्य शिका

तुमच्या मोकळ्या वेळेत, सतत इतर नोकऱ्या शोधा आणि काही नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छोटे कोर्स करू शकता, कोणताही विशेष कार्यक्रम शिकू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीने पुढे जाण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही तुमच्या पॅशनचे बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतर केले तर ते तुम्हाला वेगळ्या प्रकारचा आनंद देईल आणि तुम्हाला तुमची नोकरी गमावण्याची चिंता करावी लागणार नाही.

5/7
नोकरीची संधी निर्माण करा
नोकरीची संधी निर्माण करा

एखाद्या स्टार्टअपमधून नोकरी गमावल्यानंतर मार्केटमध्ये तशा प्रकारच्या रिक्त जागा शोधा. तिथेही तुम्हाला चांगला पगार मिळत नसेल तर काही दिवस योग्य रिसर्च करून मार्केटमध्ये कशाची गरज आहे ते पहा.त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना भेटून उत्तम प्रेझेंटेशन द्या. तुमच्या कल्पनेने प्रभावित होऊन तुमच्यासाठी नवीन नोकरीची संधी निर्माण होतील.  ज्या आधीपासून बाजारात उपलब्ध नव्हत्या.

6/7
या गोष्टी लक्षात ठेवा
या गोष्टी लक्षात ठेवा

स्टार्टअपमधून तुमची नोकरी गमावल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम निराशेपासून दूर राहायचे आहे. तसेच नोकरी शोधत राहायचंय.  बहुतेक लोक तुम्हाला नोकरी देण्यास नकार देतील, याची खूणगाठ मनाशी बांधून ठेवा. त्यामुळे हे प्रत्यक्षात घडेल त्यावेळी तुम्हाला कमी वाईट वाटेल.

7/7
रेझ्युमे अधिक आकर्षित बनवा
रेझ्युमे अधिक आकर्षित बनवा

तुमच्या क्षेत्राशी संबंधित तज्ञ, वरिष्ठ आणि मित्र यांच्याशी बोलत राहा. जेणेकरून त्यांना काही संधी दिसली तर ते तुम्हाला त्वरित मदत करू शकतील. तुमचा रेझ्युमे अधिक आकर्षक बनवा आणि मुलाखतीसाठी चांगली तयारी केल्यानंतरच मुलाखतीला जा.





Read More