Bajaj Finance Multibagger Q4FY23 Business Update: बजाज फायनान्स या मल्टिबॅगर स्टॉकनं (Multibagger Stock)चांगला परफॉमन्स दाखवला आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉककडे वळले आहे. तेव्हा वाट कसली पाहताय आजच या स्टॉकबद्दल Stock Performance) जाणून घ्या.
सध्या शेअर मार्केटमध्ये चांगली उसळी पाहायला मिळते आहे. त्यातून आता अशाच एका मल्टिबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. हा स्टॉक आहे. बजाज फायनान्स
बजाज फायनान्स हा लॉन्ग टर्म मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. गेल्या 5 वर्षात या स्टॉकनं 200 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्यामुळे अल्पावधीतच हा स्टॉक लोकप्रिय ठरला आहे.
जर तुम्ही पाच वर्षांपुर्वी 1 लाख रूपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आता 3 लाख रूपये झाली असेल.
सध्या मल्टिबॅगर स्टॉक्सचा जमाना आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष हे आता मल्टिबॅगर स्टॉक्सकडे लागले आहे.
5 एप्रिलला या स्टॉक्सचा मार्केट कॅप हा बीएसईवर 3,48,667 कोटी रूपये इतका होता. बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 4 एप्रिलला ही 5715 रूपये इतकी होती. यातून 40 टक्के परतावा मिळू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)
सर्व छाया - झी न्यूज