PHOTOS

बॅडमिंटनपटू 'अशी' बनली आयपीएस; 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी

अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे.

Advertisement
1/10
बॅडमिंटनपटू 'अशी' बनली IPS, 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी!
बॅडमिंटनपटू 'अशी' बनली IPS, 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी!

IPS Kuhoo Garg Inspirational Story: आयएएस, आयपीएस बनण्यासाठी दरवर्षी लाखो तरुण तयारी करत असतात. बहुतांशजण महाविद्यालयीन शिक्षणासोबतच यूपीएससीची तयारी सुरु करतात. तर काहीजणांना दुसऱ्या क्षेत्रात चांगले करिअर असतानाही यूपीएससीकडे आकर्षित होतात. आजची कहाणी अशाच एका तरुणीची आहे.

2/10
...पण हार मानली नाही
...पण हार मानली नाही

अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे. 

3/10
यूपीएससीमध्ये ऑल इंडिया 178 रॅंक
यूपीएससीमध्ये ऑल इंडिया 178 रॅंक

कुहू गर्ग एक चांगली ऍथलीट आहेत. पण त्यांनी 2023 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्या ऑल इंडिया रँक (AIR) 178 मिळवून उत्तीर्ण झाल्या. 

4/10
वडील निवृत्त डीजीपी
वडील निवृत्त डीजीपी

कुहू गर्ग यांना आयपीएस बनण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील अशोक कुमार हे उत्तराखंडचे निवृत्त डीजीपी आहेत. वडिलांच्या  पावलावर पाऊल ठेवत गर्ग यांनी यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 

5/10
कोण आहेत कुहू गर्ग?
कोण आहेत कुहू गर्ग?

कुहू गर्ग या बॅडमिंटनपटू असून त्या मूळच्या डेहराडून, उत्तराखंडच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील अशोक कुमार हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कुहू गर्ग यांची आई अलकनंदा अशोक पंतनगर या विद्यापीठात नोकरीला आहेत.

6/10
वयाच्या 9व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळल्या
वयाच्या 9व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळल्या

कुहू गर्गने आपले प्राथमिक शिक्षण सेंट थॉमस कॉलेज, डेहराडूनमधून केले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. कुहू गर्ग यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती.

7/10
अनेक पदके जिंकली
अनेक पदके जिंकली

कुहू यांनी आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये 56 राष्ट्रीय (ऑल इंडिया रँकिंग) आणि 19 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्यांनी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही आपले नाव नोंदवले आहे. 

8/10
आयुष्याला वेगळ वळण
 आयुष्याला वेगळ वळण

2018 मध्ये गर्ग यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरीही खेळली होती. पण त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळ वळण मिळालं. त्यांनी या घटनेकडे संधी म्हणून पाहिले.

9/10
गुडघ्याला गंभीर दुखापत
गुडघ्याला गंभीर दुखापत

कुहू गर्गचा यूपीएससी प्रवास सुरू झाला जेव्हा तिला बॅडमिंटन खेळताना गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना बराच वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, त्यामुळे त्यांचे लक्ष नागरी सेवा परीक्षेवर केंद्रित झाले.

10/10
वेळेचा पुरेपूर उपयोग
 वेळेचा पुरेपूर उपयोग

कुहू गर्ग यांनी वेळेचा पुरेपूर उपयोग केला. परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. खूप मेहनत घेतली आणि त्यांना फळ मिळाले. कुहू गर्ग यांनी UPSC 2023 मध्ये 178 ऑल इंडिया रॅंकिंग मिळवले.





Read More