कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं.
IAS Success Story: कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं.
डॉ. नेहा राजपूत या मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्ये 6 वर्षे काम करत होत्या. रुग्णालयात जाण, फॉरेन्सिक विभागात काम करणं हे नेहमीचच झालं होतं. हे सर्व करत असताना त्यांना नवं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. आयपीएस बनण्याचं स्वप्न...जी नोकरी मिळवण्यासाठी देशातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात.
नेहाने नोकरी संभाळून यूपीएससीची तयारी केली. दिवसा काम आणि घरी आलं की अभ्यास करणं असं नियोजन सुरु होतं. या मेहनतीचं नेहा यांना फळ मिळालं. यूपीएससीमध्ये त्यांना ऑल इंडिया 51 वा क्रमांक मिळाला.
आयएएस नेहा राजपूत या महाराष्ट्रातील जळगावच्या मूळ रहिवासी आहेत. 26 वर्षीय डॉ. नेहा राजपूत यांनी 2024 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया 51 रॅंक मिळवला आहे.
नेहा यांनी 2016 मध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी परळ येथील मुंबई पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएस आणि इंटर्नशिपनंतर डॉ.राजपूत फॉरेन्सिक विभागात रुजू झाल्या होत्या.
निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारी ताकद आयएएस अधिकाऱ्याकडे असते. IAS पदावर असताना मला आरोग्य क्षेत्रात काम करायचं असल्याचे नेहा सांगतात.
एमबीबीएस करुन आयुष्यातील पहिलं स्वप्न तर पूर्ण झालं होतं. पण आपल्याला हवा असलेला प्रभाव वैयक्तिक संवादाच्या पलीकडे आहे, असं त्यांना वाटू लागलं.
ते दिवस होते कोविडचे..सारं काही ठप्प झालं होतं. आपण असं काहीतरी केले पाहिजे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम केल्याचे आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचे समाधान मिळेल, असे नेहा यांना वाटायचं
यातून मग सिव्हिल सर्व्हंट बनण्याची कल्पना नेहा यांच्या मनात आली. वैद्यकीय क्षेत्रातील इंटर्नशिप संपताच त्यांनी यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली.
आधीच वैद्यकीय शिक्षण कठीण त्यात नेहमीचे काम..या सर्वात नेहाने यूपीएससीची तयारी सुरू केली. कामामुळे अभ्यासाला जास्त वेळ मिळत नव्हता. त्या पारंपरिक कोचिंग करण्याचा पर्याय टॅबलेट कोर्सचा पर्याय निवडला.
नेहा यांनी मानववंशशास्त्र हा विषय ऑप्शनल पेपर म्हणून ठेवला. तोही वैद्यकीय शास्त्राशी संबंधित विषय होता. डॉक्टरपासून ते आयएएस बनण्याच्या या प्रवासात मला कुटुंबीय, मित्रमंडळी आणि इतर सहकाऱ्यांची मोठी साथ मिळाल्याचे नेहा सांगतात.