IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.
IAS Ananya Singh: आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. कारण जन्मत: कोणी शिकून येत नाही. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावरच सर्वकाही साध्य करता येते. याच जोरावर काही व्यक्तिमत्व तर कमी वयातच यश मिळवतात.
यूपीएससी परीक्षा ही जगातील कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. पण IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.
वयाच्या 22 व्या वर्षी अनन्या आयएएस झाल्या. मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या पदावर पोहोचल्यावर त्या थेट पीएमओला रिपोर्ट करतील.
बारावीनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. चांगले गुण मिळाल्याने अनन्याला मेडिकल किंवा इंजिनीअरिंग क्षेत्र निवडता आले असते. पण आयएएस अधिकारी बनणे हे अनन्याचे बालपणीचे स्वप्न होते.
पदवीनंतर लगेचच अनन्याने यूपीएससी तयारीचा प्रवास सुरू केला. 2019 मध्ये त्यांना यूपीएससीचा पहिला अटेम्प्ट द्यायचा होता. यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला आणि त्यांना मेहनतीचे फळ मिळाले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना ऑल इंडिया रॅंकिंग-51 मिळाले.
अनन्याने प्रामुख्याने लेखनावर लक्ष केंद्रित केले. सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. रोजचे 7 ते 8 तास सतत अभ्यास केला. सध्या अनन्या या पश्चिम बंगाल केडरच्या देशातील सर्वात प्रिय नोकरशहांपैकी एक आहेत.
अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या आपल्या जिवनाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियात शेअर करत असतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 43.5K फॉलोअर्स आहेत.