PHOTOS

Success Story: यूपीएएससी देताना आईचं निधन पण हार नाही मानली; अंकिता चौधरी 'अशा' बनल्या आयएएस!

बालपणापासूनच अंकिता यांच्या वाट्याला संघर्ष पूजलेला होता. पण समोर आलेल्या आव्हानांना त्यांनी वेळोवेळी धैर्याने तोंड दिले.

Advertisement
1/7
Success Story: यूपीएएससी देताना आईचं निधन पण हार नाही मानली; अंकिता चौधरी 'अशा' बनल्या आयएएस!
Success Story: यूपीएएससी देताना आईचं निधन पण हार नाही मानली; अंकिता चौधरी 'अशा' बनल्या आयएएस!

IAS Ankita Choudhary Success Story:  यशस्वी लोकांच्या कहाण्या संघर्षातून आलेल्या असतात. पण त्या काळत धैर्य राखून, प्रामाणिक प्रयत्न केलेले असतात. त्याचीच प्रचिती यशामध्ये झालेली असते. आयएएस अंकिता चौधरी यांची कहाणी यूपीएससी देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.

2/7
धैर्याने दिले तोंड
 धैर्याने दिले तोंड

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मेहम येथील एका सामान्य कुटुंबात अंकिता चौधरी यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांच्या वाट्याला संघर्ष पूजलेला होता. पण समोर आलेल्या आव्हानांना त्यांनी वेळोवेळी धैर्याने तोंड दिले. यूपीएससचीचा दुसरा अटेम्ट देताना त्यांच्या आयुष्यात दु:खद घटना घडली. पण त्यातून त्या सावरल्या.

3/7
लहानपणापासूनच स्वप्न
 लहानपणापासूनच स्वप्न

अंकिताचे वडील साखर कारखान्यात अकाउंटंट तर आई गृहिणी होती. अंकिता सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर अंकिता यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली. आयएएस अधिकारी व्हायचं हे अंकिता यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं.

4/7
पहिल्या प्रयत्नात अपयश
पहिल्या प्रयत्नात अपयश

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिताने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांनी 2017 मध्ये पहिला प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे अंकिताने हार मानली नाही. यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. पण यूपीएससचा दुसऱ्या प्रयत्नासाठी तयारी करत होती, तेव्हा तिच्या आयुष्यात अशी घटना घडली, ज्याची अंकिताने कधी कल्पनाही केली नव्हती.

5/7
आईचे रस्ते अपघातात निधन
आईचे रस्ते अपघातात निधन

अंकिता चौधरी यांच्या आईचे एका रस्ते अपघातात निधन झाले होते. ज्यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. आईच्या जाण्यानंतर त्यांना आपले जीवन खूप कठीण वाटत होते. पुढे कसे जायचे? हे त्यांना समजत नव्हते. अशा परिस्थितीत वडिलांनी मुलीचा आत्मविश्वास वाढवला.

6/7
14 वा क्रमांक
14 वा क्रमांक

यानंतर अंकिता चौधरी यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी त्या परीक्षा उत्तीर्णही झाल्या. 2018 मध्ये दिलेल्या पुढच्या प्रयत्नात अंकिताने आपल्या मेहनतीने 14 वा क्रमांक मिळवला.

7/7
उमेदवारांना दिला सल्ला!
उमेदवारांना दिला सल्ला!

कोणतीही व्यक्ती कोणत्याही पार्श्वभूमीतून असू शकते. पण यशासाठी उमेदवाराला एक ठोस रणनीती आणि कठोर परिश्रम करावे लागतात, असे आयएएस अंकिता चौधरी सांगतात. उमेदवाराने अपयशाला शिकण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. पुढील प्रयत्नात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने उत्तर लेखनाचा सराव केला पाहिजे, असेही त्या पुढे सांगतात.





Read More