आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
IAS Ritu Suhas Success Story: ज्याच्या आयुष्यात संघर्ष जितका लवकर येतो तितक्या लवकर तो माणूस यशस्वी होतो. संघर्ष त्याला माणूस म्हणून घडवत असतो. यातूनच पुढे यशोगाथा लिहिल्या जातात. आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
आयएएस रितू या उत्तर प्रदेशच्या स्थानिक सरकार संचालनालयाच्या अतिरिक्त संचालक म्हणून लखनौमध्ये तैनात आहेत. लखनऊमध्येच त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले होते. रितू सुहासचा जन्म 16 एप्रिल 1976 रोजी लखनऊमध्ये झाला.
त्यांचे वडील आरपी शर्मा लखनौ उच्च न्यायालयात वकील होते. पण तरीही कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी काही चांगली नव्हती. त्यामुळेच त्यांना अभ्यास पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आयुष्यातील रितू यांनी अनेक चढ-उतार पाहिले. यातच नवयुग गर्ल्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करुन त्यांनी आयएएसची तयारी सुरू केली.
रितूसाठी आयएएसची तयारी करणे सोपे नव्हते. कारण रितू राहत असलेल्या परिवारात मुलींच्या शिक्षणाबाबत आणि नोकरीबाबत फारशी जागृती नव्हती. मुलीने नोकरी करावी यासाठी कुटुंबीयही अनुकूल नव्हते. पण सरकारी नोकरीचे कारण देत त्या तयारीत करत राहिल्या. कुटुंबियांनी त्यांचे समर्पण पाहिले होते. रितू यांनी त्यांना जे करायचे तेच केले.
रितू 2004 मध्ये UPPCS परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि पीसीएस अधिकारी बनल्या. 2005 मध्ये त्यांना मथुरा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. रितूच्या कर्तृत्वामुळेच त्यांना विशेष बढती मिळाली. ती पीसीएसमधून आयएएस झाली.
आर्थिक चणचण असताना त्यांनी कशीतरी बीएची पदवी पूर्ण केली. कुटुंबाकडे त्या पैसे मागू शकत नव्हत्या. वेळ अशी होती की त्यांच्याकडे वर्तमानपत्र घेण्यासही पैसे नव्हते. पण त्यांनी जिद्द हारली नाही. मुलांना शिकवणीही दिली आणि थोडेफार पैसे जमा केले.
रितू सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. त्यांनी आयएएस अधिकारी सुहास एलवाय यांच्याशी विवाह केला. ते एक व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटन खेळाडू देखील आहे. त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि थायलंडमध्ये या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
रितू यांनी त्यांचा आत्मविश्वास कधीही डगमगू दिला नाही. त्यांनी दाखवलेले धाडस आणि परिश्रम यामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. रितू सुहास यांनी 2019 मध्ये मिसेस इंडियाचा किताबही पटकावला होता. हे देखील त्यांच्या लोकप्रियतेचे एक कारण आहे.