PHOTOS

उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार

शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते.  हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता. 

Advertisement
1/8
उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, भविष्यात पैशांची कमी नाही जाणवणार
उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, भविष्यात पैशांची कमी नाही जाणवणार

Summer Vacation Courses: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा मस्ती. ही सुट्टी कधी सुरु होतेय याची वाट विद्यार्थी पाहत असतात. काहीजण खेळण्यात, मजा मस्ती, आराम करण्यात सुट्टी घालवतात. तर काहीजण नृत्य, संगीत अशा काही कला शिकण्यात सुट्टी घालवतात. 

2/8
करिअर ग्रोथ करण्याची संधी
करिअर ग्रोथ करण्याची संधी

शाळेच्या सुट्ट्यांचा उपयोग तुम्ही करिअर ग्रोथ करण्यासाठी करु शकता.एकदा का शाळा, कॉलेज सुरु झाले तर या गोष्टींसाठी वेळ काढणे तुम्हाला कठीण वाटेल.  काहीतरी चांगले शिकण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून मिळते. अशा कोर्सबद्दल जाणून घेऊया, जे शिकल्यावर तुम्हाला भविष्यात चांगली कमाईदेखील करता येईल. 

3/8
वॉइस मॉड्युलेशन
वॉइस मॉड्युलेशन

तुमचा आवाज चांगला असेल तर सुट्टीच्या काळात वॉइस मॉड्युलेशन शिकून घ्या. यामुळे तुम्ही आवाजाचा पिच आणि वॉल्यूम आवाज ऐकणाऱ्यांच्या हिशोबाने सेट करायला शिकता. हा कोर्स केलात तर भविष्यात तुम्हाला जाहिरात, फीचर फिल्म, थिएटर आणि रेडिओमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. नोकरी व्यतिरिक्त फ्रीलान्स म्हणून भविष्यात तुम्हाला याचा उपयोग होईल. 

4/8
इंग्रजी कम्युनिकेशन स्किल्स
इंग्रजी कम्युनिकेशन स्किल्स

 

सध्याच्या जमान्यात इंग्रजीला फार महत्व आहे. कंटेट रायटर किंवा पत्रकारीतेत यायचं नसलं तरी इतरांशी संवाद साधताना तुम्हाला इंग्रजी संवादाचा उपयोग होईल. भविष्यात कधी मुलाखत द्यायला जाल तेव्हादेखील हे उपयोगी येईल. 

5/8
फॉरेन लॅग्वेज
फॉरेन लॅग्वेज

सध्या विदेशी भाषा शिकलेल्यांना जास्त मागणी आहे. तुमच्या रेझ्युमेवर विदेशी भाषेसंदर्भा अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिशसारख्या भाषा शिकून तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. 

6/8
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर

एमएस एक्सल, पॉवर पॉइंट, एमएस वर्ड असे सर्टिफिकेट कोर्स सुट्ट्यांच्या काळात करुन ठेवा. कॉम्प्युटर चालवण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्हाला बारावीनंतर चांगली नोकरी मिळू शकते. 

7/8
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

सध्या जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा आहे. यासंदर्भात जाणून घेण्यास, सर्टिफिकेट कोर्स करण्याची सुट्टीत चांगली संधी आहे. आयआयएम, आयआयटी सारख्या संस्थांमध्ये अनेक ऑनलाइन कोर्स असतात. यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे कौशल्य वाढवू शकता. 

8/8
शिकलेले कधीही फुकट जात नाही
शिकलेले कधीही फुकट जात नाही

शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते.  हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता. 





Read More