Surya Gochar 2023 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर नवरात्रीत सूर्यदेव कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यादिवशी सर्वपित्री अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या आहे.
त्यानंतर नवरात्रीत 18 ऑक्टोबरला सूर्यदेव दुपारी 1:18 वाजता कन्या रास सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य गोचरमुळे कुठल्या राशींवर धनवर्षावर होणार पाहूयात
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या लोकांचे भाग्य 18 ऑक्टोबरपासून उजळून निघणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
सूर्याचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळून देणार आहे. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. विशेषतः व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे.
सूर्याचे संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठणार आहात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे.
सूर्य संक्रमण मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येणार आहे. सकारात्मक परिणामासोबत यशाची दारं उघडणार आहे. जीवनात अनेक महत्त्वाचे बदल दिसून येणार आहे. उत्पन्न वाढ होणार आहे.
सूर्याचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना फलदायक असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमची कार्यशैली चांगली होणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा फायदा मिळणार आहे. तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)