PHOTOS

फक्त अभिनेता नव्हे तर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; उभारलंय इतकं मोठं साम्राज्य

सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यातील बरेचसे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. वयाच्या 63 व्या वर्षीही तो आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित न राहता, सुनील शेट्टीने विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. तो मुंबईतील अनेक हॉटेल्सचा मालकही आहे. पाहूयात सुनील शेट्टीने कोणकोणत्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Advertisement
1/9

बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टी त्याच्या दमदार अभिनयासोबतच व्यवसायिक यशासाठी देखील ओळखला जातो. गेली 33 वर्षे तो सिनेसृष्टीत सक्रिय असून, आजही त्याचा प्रभाव कायम आहे.

2/9

1992 मध्ये 'बलवान' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर 'दिलवाले', 'मोहरा', 'हेरा फेरी', 'बॉर्डर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्याला घराघरात पोहोचवलं. 

3/9

विशेषतः 'बॉर्डर' या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.

4/9

पण केवळ अभिनय नव्हे, तर सुनील शेट्टी हे यशस्वी उद्योजक देखील आहेत. चित्रपटसृष्टीबरोबरच त्याने हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, एज्युकेशन, फिटनेस आणि प्रोडक्शन यांसारख्या विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे.

5/9

त्याचे मिसचीफ डाइनिंग आणि क्लब H2O ही लोकप्रिय हॉटेल्स चेन असून, त्याचे मालकत्व देखील सुनील शेट्टीकडेच आहे. 

6/9

याशिवाय त्याने 10 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. सुनील शेट्टी म्हणाला की, 'माझं उद्दिष्ट नेहमीच असं राहिलं आहे की, जिथे मूल्य आहे, तिथे गुंतवणूक करायची.'

7/9

तो स्वतःचे S2 Realty and Developers Pvt. Ltd., Popcorn Entertainment Pvt. Ltd., आणि Sai Estate Management & Skills Institute सारखे व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे.

8/9

सुनील शेट्टी एक उत्तम अभिनेता असून, त्याची व्यावसायिक दूरदृष्टी देखील तितकीच प्रेरणादायी आहे. 

9/9

त्यामुळेच तो फक्त सिनेमांपुरता मर्यादित न राहता फिटनेस आयकॉन, समाजसेवक आणि व्यवसायिक मार्गदर्शक म्हणूनही ओळखला जातो.





Read More