Sunny Deol Fought with Hema Malini: 'गदर-2'मुळे पुन्हा एकदा देओल कुटुंब चर्चेत आलं आहे. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्यानंतर हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल त्यांच्यावर चांगलाच संतापला होता. या लग्नानंतर सनी देओल आणि हेमा मालिनी तसेच त्यांच्या मुलींशी गदर फेम अभिनेत्याचं फारसं चांगलं नातं नव्हतं. या दोघांचं नातं आता फार छान वाटत असलं तरी पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. सनीने अगदी हेमा मालिनी यांच्यावर हात उचलल्याच्या बातम्याही समोर आलेल्या. नक्की काय घडलेलं पाहूयात...
सध्या अभिनेता सनी देओलचं धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली इशा देओल व आहना देओलबरोबरचं नातं फार छान आहे. मात्र काही काळापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. प्रकाश कौर यांच्याशी विवाह केल्यानंतर 2 मुलांचे वडील असताना धर्मेंद्र यांनी अचानक दुसरं लग्न केल्यानं सनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच नव्या सावत्र आईवर म्हणजे हेमा मालिनी यांच्या चांगलाच संतापला होता.
काही वर्षांपूर्वी सनी देओल हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींशी बोलतही नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली असल्याने लवकरच संपूर्ण देओल कुटुंबाला एकत्र पाहण्याची संधी मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
काही दिवसांपूर्वीच हेमा मालिनी यांनी त्यांचा सावत्र मुलगा असलेल्या सनी देओलचं 'गदर-2' मधील कामगिरीसाठी कौतुक केलं. हा चित्रपट फारच मनोरंजन करणार असल्याचं म्हटलं.
हेमा मालिनी यांनी केलेल्या कौतुकाची चर्चा असतानाच एक जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत आहे. या ओरिजनल ड्रीम गर्लबरोबर वडील धर्मेंद्र यांनी लग्न केलं म्हणून कधी काळी सनी देओलने चक्क आपल्या सावत्र आईवर म्हणजेच हेमा मालिनीवर हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
धर्मेंद्र यांच्यावर सनीनं हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यावेळी या बातम्या वाऱ्यासारखी पसरल्या. आपल्या मुलाची बाजू घेण्यासाठी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर समोर आल्या आणि त्यांनी सनीने धर्मेंद्र यांच्यावर हल्ला केल्याची बातमी खोटी असल्याचं म्हटलं होतं.
प्रकाश कौर यांनी सनीवरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. धर्मेंद्र यांनी हेमामालिनीबरोबर लग्न करण्याच्या निर्णयामध्ये मोठा धक्का आम्हाला नक्कीच बसला होता. मात्र आपण आपल्या मुलांना वडीलधाऱ्यावर हात उगारण्याचे संस्कार केलेले नाहीत, असं प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.
त्यावेळी हेमा मालिनी यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत असं काहीही झालं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आपलं आणि सावत्र मुलगा असलेल्या सनीचं नातं कसं आहे याबद्दलही हेमामालिनी यांनी भाष्य केलं होतं.
"माझ्यात आणि सनीमध्ये कसं नात आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. आमचं नातं फार छान आणि सामंजस्याचं आहे. आम्हाला गरज असते तेव्हा तो आमच्या पाठीशी उभा असतो. खास करुन जेव्हा आमचा अपघात झालेला तेव्हाही तो आमच्या पाठीशी होता," असं हेमामालिनी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
"अपघातानंतर तो पहिला व्यक्ती होता जो घरी आला आणि मला भेटला. डॉक्टर माझ्या चेहऱ्यावर टाके घालत होते तेव्हा तो तिथेच उभा राहून सारं काही पाहत होता. त्याच्या या कृतीने मला आश्चर्याचा धक्का बसला होता. यामधूनचं आमचं नातं कसं आहे हे दिसून येतं," असं हेमामालिनी यांनी म्हटलेलं.
सनी देओलने इशा देओल आणि आहाना दओलासाठी सनीने 'गदर-2'च्या विशेष शोचं आयोजन केलं होतं. पहिल्यांदाच हे कुटुंबिय अशापद्धतीने सार्वजनिकरित्या समोर आले. इशानेही 'गदर-2'चं प्रमोशन केलं. यंदाच्या रक्षाबंधनला सनी देओल इशा आणि आहानाला घरी जाऊन भेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.