PHOTOS

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या

Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे. 

Advertisement
1/12
मेष (Aries)
मेष (Aries)

या राशींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात. डोकेदुशी आणि हाडांची समस्या उद्धवू शकते.  उपाय - रोज सकाळी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. 

2/12
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. पैसा हातात टिकणार नाही. डोळे आणि हृदयाचं आरोग्य जपा.  उपाय - रोज गूळ, गहू आणि मैदाचं दान करा. 

3/12
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीसाठी सूर्य गोचर फलदायी ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.  उपाय - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. 

4/12
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. नोकरदार वर्गाला जरा सतर्क राहण्याची गरज आहे.  उपाय - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. 

5/12
सिंह (Leo)
सिंह (Leo)

या राशींच्या लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सूर्य गोचरमुळे अपघाताची शक्यता आहे. करिअरची विशेष काळजी घ्या.  उपाय - रोज गूळ, गूह आणि मैदांचे दान करा. 

6/12
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दुखापत होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद उद्धवू शकतात.  उपाय - सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. 

7/12
तूळ (Libra)
तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचरमुळे अतिशय लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.  उपाय -  सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. 

8/12
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर फलदायी ठरणार आहे. आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारणा आहे. या काळात संकट दूर होतील.  उपाय - रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. 

9/12
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या लोकांनी करिअरकडे लक्ष द्यावे. आरोग्याची समस्या होऊ शकते.  उपाय - गूळ, गहू, मैदा यांचं दान करा. 

10/12
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. उच्च अधिकाऱ्याशी व्यवहार करताना काळजी घ्या. मालमत्तेसंदर्भात निर्णय घेताना लक्ष ठेवा.  उपाय -  सूर्यदेवाच्या मंत्रांचा रोज जप करा. 

11/12
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. शत्रू आणि विरोधकांचा सहज पराभव करु शकाल. करिअरमध्ये पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे.  उपाय - रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. 

12/12
मीन (Pisces)
मीन (Pisces)

या राशीच्या लोकांनी कुटुंबाकडे लक्ष द्या. कौटुंबिक वादामुळे समस्या निर्माण होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. करिअरमध्ये योग्य वेळा निर्णय घ्या. 

उपाय - सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.





Read More