Surya Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या
लवकरच म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य आपली रास बदलणार आहे. सूर्य प्रत्येक महिन्यात रास बदलतो. येत्या शुक्रवारी तो मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसरा सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. मीन राशीत सूर्याची युती ही राहुशी होणार आहे. काही ग्रहांचं एकमेकांशी पटत नाही, अशात तुमच्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. सूर्य गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे, तर काहींसाठी संकट घेऊन येणार आहे. (surya gochar 2023 on 14th april Know the effect all 12 zodiac sign Horoscope astro news in marathi)
या राशीसाठी सूर्य गोचर चांगल ठरणार नाही आहे. तुमच्या अहंकार आणि आत्मविश्वास वाढणार आहे. पाटर्नरशीपमधील व्यवहारात आर्थिक फटक्याशिवाय अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
या राशीसाठीही सूर्य गोचर हानीकारक ठरणार आहे. या लोकांना मानसिक तणावाला सामोरे जाव लागू शकतं. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. सरकारी कामात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर शुभ ठरणार आहे. सूर्य आणि राहूचा हा संयोग दहाव्या घरात होत असल्याने नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. मात्र प्रवासदरम्यान आरोग्याची समस्या जाणवू शकते. कामामध्ये विशेष लक्ष द्या.
सूर्य गोचरमुळे या राशीवर संमिश्र परिणाम दिसून येणार आहे. धार्मिक कार्याकडे ओढ वाढणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. मात्र वडिलधाऱ्या मंडळीशी वाद होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर कठीण असणार आहे. सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. शारीरिक वेदनांकडे वेळीच लक्ष द्या.
या राशीच्या लोकांनी सूर्य गोचर काळात कुटुंबाकडे लक्ष द्यावे. कारण कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुठलाही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा. जोडीदारासोबत संवाद साधा.
या राशीसाठी तर सूर्य गोचर बिलकुल चांगलं नसणार आहे. या काळात गुप्त शत्रू सक्रिय होणार आहे. त्यामुळे आयुष्यात अनेक समस्या वाढणार आहे. आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पण या सगळ्या परिस्थिती कुटूंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभे असणार आहे.
या राशीसाठी सूर्य गोचर चांगला ठरणार आहे. मात्र काही वेळा तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर अडचणी घेऊन येणार आहे. व्यवसायात ताण वाढणार आहे. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. तुमचं धैर्य वाढणार आहे. धार्मिक स्थळाला दर्शन देणार आहात. कामामध्ये काळजी घ्या.
या राशीच्या लोकांनी सूर्य गोचर काळात जीभेवर नियंत्रण ठेवा. आपल्या वागणुकीमुळे कोणाला दुखवणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा धनहानी होण्याची शक्यता आहे. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)