Zodiac Sign : ग्रहांचा राजा सूर्य देव आता तूळ राशीत प्रवेश (Surya gochar) करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
18 ऑक्टोबर रोजी 24 तासांनंतर सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.
व्यवसाय आणि शिक्षणात देखील मोठे फायदे होतील. त्याचबरोबर मनात असेल ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सूर्यदेवाचे संक्रमण धनु राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तसेच कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.
धनू राशीच्या काही लोकांना अपत्य होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मालमत्तेद्वारे नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन राशी लोकांच्या आयुष्यात अचानक अनुकूल बदल होऊ शकतात. सूर्य देव तुमच्या राशीच्या पाचव्या घरात जाणार आहे.
सूर्यदेवाची कृपा असल्याने गोड बातमी मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल.
सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल.
तुम्ही सामाजिकदृष्ट्याही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. विशेष भेटवस्तू देखील तुम्हाला मिळू शकतात.