PHOTOS

Surya Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण? 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, तर 'या' लोकांनी राहवं सावधान!

Solar Eclipse 2023 : ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) हे अशुभ मानलं जातं. खास करुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. याशिवाय भाज्या चिरू नये किंवा शिवणकाम करु नयेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं ग्रहण काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Advertisement
1/9
कधी आहे सूर्यग्रहण आणि वेळ? (surya grahan 2023 in india date and time)
कधी आहे सूर्यग्रहण आणि वेळ? (surya grahan 2023 in india date and time)

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल (solar eclipse april) गुरुवारी असणार आहे. हे ग्रहण सकाळी 7.45 पासून दुपारी 12.29 पर्यंत दिसणार आहे. 

 

2/9
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण धनलाभ घेऊन येणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. तुमच्या सर्व इच्छा ग्रहणाच्या दिवशी पूर्ण होतील, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

3/9
मिथुन (Gemini)
मिथुन  (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी ग्रह फलदायी ठरणार आहे. आर्थिक लाभासह प्रवासाचे योग आहेत. अकडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

4/9
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे नशिबाची तगडी साथ मिळणार आहे. उद्योगपतींना फायदा होणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल.

5/9
मेष (Aries)
मेष (Aries)

या राशीच्या लोकांच्या ग्रहण काळात समस्या वाढण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक आणि करिअरबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यावे.

6/9
सिंह (Leo)
सिंह (Leo)

या राशीच्या लोकांनी शिक्षण आणि नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्यावी. वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी हा काळ चांगला नाही, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय काळजीपूर्वक घ्या.

7/9
कन्या (Virgo)
 कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी ग्रहण अडचणीचा ठरणार आहे. प्रवासादरम्यान काळजी घ्या, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

8/9
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक (Scorpio)

ग्रहण काळात ऑफिसमध्ये काळजी घ्या. तुमचे शत्रू कामामध्ये काडी करण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक समस्या वाढू शकते. 

9/9
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जुने आजार परत त्रास देण्याची शक्यता आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More