PHOTOS

Surya Grahan 2025 : सूर्यग्रहण 4 राशींच्या आयुष्यात आणेल अंधार! आर्थिक नुकसानसह होणार वादविवाद

Surya Grahan 2025 Effects on Zodiac : सध्या सूर्यग्रहणादरम्यान अंधार पडण्याची बातमी जोरात आहे. जरी त्या सूर्यग्रहणाला बराच वेळ आहे. पण 2025 मधील दुसरं सूर्यग्रहण होणार आहे आणि ते काही राशींसाठी धोकादायक ठरणार आहे.  

Advertisement
1/9
कधी आहे सूर्यग्रहण?
कधी आहे सूर्यग्रहण?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 2 ऑगस्ट 2025 ला सूर्यग्रहण असल्याची बातमी वेगाने पसरली आहे. 100 वर्षांतील सर्वात मोठं पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे, अशा आशयाच्या बातम्या जोर धरत आहेत. 

2/9
सूर्यग्रहणाच्या तारखेवरुन गोंधळ
सूर्यग्रहणाच्या तारखेवरुन गोंधळ

तर आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि नासा यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी सूर्यग्रहण नाही. ही तारीख कोणत्याही खगोलीय घटनेशी संबंधित नाही

3/9
जाणून घ्या सूर्यग्रहणाची योग्य तारीख
जाणून घ्या सूर्यग्रहणाची योग्य तारीख

तर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर रोजी असणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला अग्नीचे वलय म्हणतात. जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 

4/9
4 राशीच्या लोकांसाठी घातक
4 राशीच्या लोकांसाठी घातक

पण सूर्यग्रहणाचा परिणाम लोकांच्या आयुष्यावर होणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. विशेषतः 4 राशीच्या लोकांना मोठे नुकसान आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. 

5/9
मिथुन रास
मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी, सूर्यग्रहणाचा काळ त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम पाहिला मिळणार आहे. घरात भांडणे आणि वाद होतील. कोणाशीही वाद घालण्याची चूक या दिवसांमध्ये करु नका. 15 दिवस धीर धरणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. 

6/9
कन्या रास
कन्या रास

ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. या राशीला सर्वात जास्त त्रास होणार आहे. ताणतणाव, आजारपण, कामात अडथळा यासारख्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. गोंधळ होणार असल्याने या काळात निर्णय घेऊ नका. 

 

7/9
धनु रास
धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण त्रासदायक ठरणार आहे. ज्या लोकांना एखाद्या प्रकरणाचा किंवा समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांनी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रकरण आणखी बिकट होणार आहे. कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर सही केल्यास संकटात सापडाल. 

8/9
मीन
मीन

मीन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होणार आहे. करिअरमध्ये आव्हाने येणार आहे. अचानक खर्च वाढल्याने बजेट बिघडणार आहे. आयुष्यात अस्थिरता राहणार आहे. 

9/9

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )





Read More