PHOTOS

SuryaKumar Yadav: भारताच्या 'Mr 360'ची रंजक Love Story; मुंबईतील कॉलेजमध्ये तिला डान्स करताना पाहिलं अन्...

SuryaKumar Yadav And Devisha Shetty: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) सध्या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. सूर्यकुमार यादवची क्रिकेटमधील कारकिर्दीबरोबरच त्याची लव्ह लाइफही फारच रंजक आहे. सूर्यकुमार यादवची कॉलेजमधील लव्ह स्टोरीबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. सूर्यकुमार यादवची पत्नी सध्या त्याची सर्वात मोठी समर्थक असून ही समर्थक त्याला कशी मिळाली जाणून घेऊयात...

Advertisement
1/5

सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) सन 2016 मध्ये दक्षिण भारतीय कुटुंबातील देविशा शेट्टीबरोबर (Devisha Shetty) विवाहबंधनात अडकला. देविशा शेट्टीचा (Devisha Shetty) जन्म 1993 साली मुंबईमध्ये झाला. 

2/5

सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि देविशा शेट्टी (Devisha Shetty) यांची पहिली भेट मुंबईमधील पोतदार कॉलेजमध्ये झाली. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात देविशाने केलेला डान्स पाहून सूर्यकुमारचा जीव देविशावर जडला.

3/5

देविशा शेट्टीला (Devisha Shetty) कॉलेजच्या काळापासूनच डान्सची फार आवड आहे. डान्सच्या कार्यक्रमापासूनच त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली. लग्नाच्या आधी दोघांनी एकमेकांना जवळजवळ 5 वर्ष डेट केलं. देविशाने सन 2013 ते 2015 दरम्यान बिगरसरकारी संस्था असलेल्या 'द लाइटहाऊस प्रोजेक्ट' साठी व्हॉलेंटियर म्हणून काम केलं. ती समाजिक कार्यांमध्ये फारच सक्रीय आहे.

4/5

देविशा शेट्टी (Devisha Shetty) अनेकदा सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असल्याचं पहायला मिळतं. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी दोघेही इन्स्टाग्रामवर फारच सक्रीय आहेत. दोघेही आपल्या चाहत्यांशी या माध्यमातून कनेक्टेड असतात.

5/5

सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) सध्या टी-20 क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी 19 एकदिवसीय सामने (ODI) आणि 45 टी-20 (T-20) सामने खेळला आहे. 





Read More