Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
एखाद्या खेळाडूची सर्वोत्तम क्षमता ओळखणं आणि ते जगाला दाखवणं ही लिडरची प्रमुख भूमिका असते, असं गौतम गंभीरने आयपीएलनंतर म्हटलं होतं.
माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मला एक खंत असेल तर ती म्हणजे सूर्यकुमार यादवचा त्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकलो नाही, असं गौतम गंभीर म्हणाला होता.
पहिल्या टी-ट्वेंटी मालिकेपूर्वी जेव्हा सूर्यकुमार यादवला पत्रकारांनी गौतम गंभीरच्या वक्तव्यावर सवाल विचारला तेव्हा सूर्याने खणखणीत उत्तर दिलं.
अभी तो करेंगे पुरा क्षमता को उपयोग, असं म्हणत सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं. सूर्याचं उत्तर ऐकून पत्रकारांना देखील हसू आवरलं नाही.
दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सूर्यकुमार यादव केकेआरमध्ये होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली तो खेळला देखील आहे. परंतू त्याला जास्त संधी मिळाली नव्हती.