Suryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच कोणता हे सुद्धा सांगितलं आहे. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...
भारतीय संघाचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव सध्या चर्चेत आहे.
सुर्यकुमारने नुकत्याच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये 8 सामन्यांमध्ये 199 धावा केल्या.
सुर्यकुमारनेने 28.42 च्या सरासरीने टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा केल्या असून यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सुर्यकुमारने त्याच्या फिल्डींगच्या माध्यमातूनही भारताच्या अनेक विजयांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे.
सुर्यकुमारने टी-20 वर्ल्ड कपच्या फायलनच्या सामन्यात सीमारेषेजवळ डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेत भारताचा विजय जवळपास सुनिश्चित केला.
भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंतिम सामन्यातील फिल्डींगचं मेडलही बीसीसीआयचे सचीव जय शाहा यांच्या हस्ते सुर्यकुमारला देण्यात आला.
मुंबईमधील सेलिब्रेशनमध्येही सुर्यकुमार अगदी उत्साहामध्ये दिसला. सुर्याने या सेलिब्रेशनमध्ये फोटोही शेअर केले आहेत.
त्यानंतर सुर्यकुमार यादवने पत्नीबरोबर टी-20 वर्ल्डकप चषक घेऊन बेडवर पहुडल्याचाही फोटोही शेअर केला.
मात्र वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या या कॅचबद्दल नुकतेच सुर्यकुमारचे एक सूचक विधान केलं आहे. आपल्या पत्नीबद्दल लिहिताना त्याने या कॅचचा उल्लेख केला आहे.
सुर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी दिविशा शेट्टी यांनी 8 जुलै रोजी आपल्या लग्नाची आठवी अॅनिव्हर्सिरी सेलिब्रेट केली.
सुर्यकुमार आणि दिविशा दोघांनीही केक कापून आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस सेलिब्रेट केला.
पत्नीबरोबरच्या या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करताना सूर्याने भन्नाट कॅप्शन दिली असून यात वर्ल्डकपमधील कॅचचा उल्लेख आहे.
29 जून रोजी फायनलमध्ये घेतलेल्या कॅचचा संदर्भ देत सुर्यकुमारने, "काल मी तो कॅच घेतलेल्या घटनेला 8 दिवस झाले. मात्र माझ्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा कॅच मी खरं तर 8 वर्षांपूर्वी घेतला होता," असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वीच सकाळी सुर्यकुमारने पत्नीबरोबरचे अनेक फोटो शेअर करत, "Happy Wedding Anniversary My Love" अशी कॅफ्शन दिली होती.
सूर्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या पहिल्या पोस्टमध्ये पत्नीसाठी मॅनेजर हा हॅशटॅग वापरत हार्ट, नजर लागू नये म्हणून वापरला जाणारा इमोजी वापरला होता.
सध्या सुर्यकुमारने पोस्ट केलेल्या पत्नीसोबतच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं असून त्याच्या क्रिएटीव्ह कॅफ्शनसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.