PHOTOS

Swami Samarth Prakat Din 2023 : दुहेरी योग! गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन, गुढीपाडव्या मुहूर्तावर फळ महोत्सव साजरा, पाहा फोटो

Swami Samarth Prakat Din 2023 : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया (shree swami samarth prakat din 2023 date)असतो. यंदा दुहेरी योग (#gudipadwa2023) घडून आला आहे. 

Advertisement
1/7

स्वामी समर्थ मंगळवेढामधून अक्कलकोट नगरीत प्रकट झाले. हा दिवस होता चैत्र शुध्द द्वितीया...तेव्हा पासून हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

2/7

गुढीपाडव्याच्या शुभ दिनी मुंबईतील परळ मठात फळ महोत्सव साजरा करण्यात आला. फळ महोत्सव निमित्त स्वामींना अर्पण करण्यात आलेल्या विशेष वस्त्रालंकार पूजन आणि सजावट करण्यात आली. 

3/7

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.

 

4/7

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी.

5/7

उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे

जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा, अशक्यही शक्य करतील स्वामी.

6/7

खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.

7/7

विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी.





Read More