Swara Bhaskar Announces Pregnancy: वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि समाजवादी पार्टीचे नेते फवाद अहमद हे फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना लग्नाच्या वेळेसही अनेकांनी ट्रोल केलं होतं. मागील काही दिवसांपासून स्वरा गरोदर असल्याच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल केलं जात होतं. मात्र आता स्वरानेच यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तिने पोस्ट केलेला फोटो आणि त्याची कॅप्शन सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वराने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
Swara Bhasker Pregnant: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आई होणार आहे. (सर्व फोटो स्वरा भास्करच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन साभार)
स्वरानेच सोशल मीडियावरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्वाराने पोस्ट केलेले फोटो आणि त्या फोटोंची कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वराने पती फहद अहमदबरोबर स्वत:चे काही सुंदर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये स्वरा गरोदर असल्याचं दिसत असून ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे.
स्वरा आणि समाजवादी पार्टीचे नेते फहद अहमद यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं.
त्यानंतर स्वरा आणि फहद यांनी अगदी वाजत गाजत थाटामाटात लग्नही केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच स्वरा गरोदर असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये स्वरा गरोदर असल्याचे दावे करत तिला ट्रोल केलं जात होतं. सोशल मीडियावर ती गरोदर असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासूनच होत्या.
मात्र आज म्हणजेच 6 जून रोजी स्वराने स्वत: सोशल मीडियावर पतीसोबतचे फोटो पोस्ट करुन गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
स्वराने ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर करताना फोटोला दिलेली कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. स्वराने काय म्हटलंय पाहूयात...
"कधी तुमच्या सर्व प्रार्थना एकाच वेळी ऐकल्या जातात. आम्ही समाधानी, कृतज्ञ, उत्साही आणि तितकेच क्लूलेस आहोत या नवीन जगात पाऊल ठेवताना," अशी कॅप्शन स्वराने या फोटोला दिली आहे.
याच फोटोमध्ये स्वराने वापरलेल्या हॅशटॅगमध्ये बाळाचा जन्म ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचं सूचित केलं आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये #comingsoon #Family #Newarrival हे हॅशटॅग वापरलेत.
स्वरा आणि फहद यांना लग्नाच्या वेळेसही अनेकांनी ट्रोल केलं होतं. आता हे दोघे आई-बाबा होणार असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.