स्वित्झर्लंडच्या वालिस परिसरात ग्लेशियर कोसळून संपूर्ण गाव उद्ध्व्स्त झाले आहे. मात्र या घटनेपूर्वी 300 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. ही घटना म्हणजे निसर्गासोबत छेडछाड केल्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.
स्वित्झर्लंडमध्ये हिमनग कोसळल्यामुळं ब्लेटेन गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. 28 मे रोजी ही घटना घडली आहे. ही घटना म्हणजे जागतिक तापमानवाढीचा ट्रेलर असल्याचे बोलले जातेय.
स्वित्झर्लंडमधील एक गाव संपूर्णपणे नष्ट झाले आहे. ही घटना म्हणजे जगासाठी धोक्याची घटना मानली जातेय.
स्वित्झर्लंडच्या वालिस परिसरात मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. हिमनग कोसळून संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले. हिमनग कोसळल्यामुळं बर्फाचा मलबा गावावर कोसळला.
तज्ज्ञांनी या आधीच या नैसर्गिक आपत्तीची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर प्रशासनाने तिथल्या नागरिकांना सतर्क करत स्थलांतरित केले होते.
40 सेंकदातच संपूर्ण गाव नष्ट झाले. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले गावात आता भयाण शांतता पसरली आहेत. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
गावातील नागरिकांना जरी स्थलांतरित करण्यात आले असले तरी एक 64 वर्षीय व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात येत आहे.
गावातून वाहणारी लोंझा नदी भूस्खलनामुळे प्रवाह अडकला आहे त्यामुळं एक मोठा कृत्रिम तलाव निर्माण झाला आहे. यामुळं पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूराच्या शक्यतेमुळं विलर आणि किप्पेल नगरपालिकांमधील इमारतीदेखील रिकामी करण्यात आल्या आहेत.