Team India Victory Parade : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाली. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.
आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.
हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना होतील.
विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.
विशेष बसमधून ते वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.त्याठिकाणी विश्वविजेत्या टीमचा जंगी सत्कार करण्यात येईल.
हा सोहळा पाहण्यासाठी वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी केलीय, त्यामुळे मुंबई पॅक झाल्याचं दृष्य समोर येत आहे.